अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१५ मध्ये साहित्य आणि जाहिरात पाठविण्याचे आवाहन

Ashlesha Apps आता BookStruck या नावाने आपल्यासाठी अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१५ घेऊन आले आहे.

यंदा अर्थ मराठी ई-दिवाळी अंकाचे तीसरे वर्ष असून मागील दोन अंकांना मिळालेला भरघोस प्रतिसाद सदर दिवाळी अंकासाठी विशेष मोलाचा आहे. सदर ई-मेल द्वारे आम्ही आपणांस BookStruck प्रस्तुत अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१५ साठी  साहित्य पाठविण्याचे आवाहन करीत आहोत. साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख १८ ऑक्टोबर २०१५ आहे. अधिक माहितीसाठी सोबत दिलेली जाहिरातीची प्रत अवश्य पहावी.

वि.सु.: आपले साहित्य यूनिकोड फॉन्टमध्ये पाठविण्यात यावे, अन्यथा आपले साहित्य स्वीकारले जाणार नाही.

‘IVF’चा प्रवास ‘डिझायनर बेबी’पर्यंत

आयव्हीएफ तंत्रामुळे १९७८मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्मली. त्याच्या २० वर्षांनंतर, म्हणजे १९९८ मध्ये औरंगाबादेत पहिला टेस्ट ट्यूब बेबी बॉय जन्माला आला. तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळेच 'आयव्हीएफ'चा सक्सेट रेट ७ ते १० टक्क्यांवरून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, लवकरच विस्तारित पीजीडी तंत्रज्ञानामुळे पाहिजे त्या रंगरूप-उंची-आकार आणि अनुवंशिक गंभीर-दुर्धर आजार-विकार टाळून खात्रीशीर सुदृढ मूल जन्माला घालणे शक्य होणार आहे. पाश्चात्य देशांत हे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भारतामध्येही अशा प्रकारची 'डिझानर बेबी' नजिकच्या भविष्यात कधीही जन्मू शकते, अशी परिस्थिती आहे. डॉ. रॉबर्ट एडवर्ड व डॉ. पॅट्रिक स्पेप्टो यांच्या अथक परिश्रमातून आणि शंभरपेक्षा जास्त प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर १९७७मध्ये 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' (आयव्हीएफ) तंत्र यशस्वी झाले आणि १९७८मध्ये लुईस ब्राऊन ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी लंडनमध्ये जन्मली. १९९८ मध्ये आैरंगाबादेतील पहिली टेस्ट ट्युब बेेबी बॉय जिल्ला हॉस्पिटलमध्ये जन्मला. यासंदर्भात जिल्ला हॉस्पिटलच्या ज्येष्ठ स्त्रीरोग-वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. मंजू जिल्ला 'मटा'ला म्हणाल्या, 'लुईस ब्राऊनला झालेली दोन्ही मुले ही नैसर्गिक प्रसुतीद्वारे झाली आहेत आणि अशी अनेक उदाहरणे आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्राचा कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले. पाश्चात्य महिलांमधील 'फॅलोपियन ट्यूब'च्या मोठ्या समस्येमुळे या तंत्राला प्रचंड मागणी होती व तंत्रज्ञान झपाट्याने विकसित गेले. स्त्री बिजकोषामध्ये थेट शुक्राणू सोडण्याच्या 'इक्सी' तंत्राने सक्सेस रेट वाढला. 'पीजीडी' तंत्रज्ञानाने शंभर टक्के निर्दोष गुणसूत्रांची निवड करणे शक्य झाले असून, त्यामुळे सक्सेस रेट ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. अर्थात, लॅबमधील अत्युच्च तंत्रज्ञान, तज्ज्ञांवर सक्सेस रेट अवलंबून असून, सर्वसाधारणपणे भारतात ५० टक्क्यांपर्यंत हा रेट आहे. आता तर जन्माला येणाऱ्या मुला-मुलीचा अपेक्षित रंग-केशरचना-उंची व इतर शरीररचनाही तीन प्रकारच्या पीजीडी तंत्रामुळे शक्य झाले आहे.'

इक्सी, लेझर अॅसिस्टेड तंत्र, लॅबमधील क्लास १०० तंत्र, औषधी-इंजेक्शनमुळे सक्सेस रेट ५० टक्क्यांपर्यंत आणणे शक्य झाले आहे. अर्थात, अजूनही तंत्रज्ञान विकसित होण्यास मोठा वाव आहे. वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असताना हे तंत्रज्ञान मानवासाठी कल्याणकारी ठरत आहे.

ज्या गोष्टींचे जगाला काहीच नवल वाटत नाही अशा गोष्टींना भारतात डोक्यावर घेतले जाते.

इंग्रजी :-
जगात कुठेही नसेल इतके महत्व भारतात इंग्रजी भाषेला दिले जाते इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी समजला जातो ... अरेरे !!!
गोरेपणा : -
गोरेपणाला भारतीय मुर्ख मंडळी एवढे भुललेत की या गोष्टीचा फायदा घेउन काही नामवंत कंपन्या गोरे बनवन्याच्या क्रिम तयार करुन दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात !
रिअॅलिटी शो :-
यात तर सगळं ठरवुन केलं जातं आणि भारतीय मुर्खासारखे खरं समजुन बघत बसतात ! त्यामुळे वास्तविक खरोखर असणारे कलाकार पडद्यामागेच राहतात हेच खुप मोठे दुर्दैव आहे !
लग्नसमारंभ :-
बडेजाव आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा सर्वात मोठा मार्ग काही मुलींच्या बापांना तर मुलगीच्या विदाई पेक्षा दिखावा महत्वाचा वाटतो !
इंजीनियरिंगची पदवी :-
७० % मुलांच्या बापांना आपल्या मुलाने समाजसेवक, नामवंत खेळाडु, देशभक्त बनन्यापेक्षा इंजीनियरिंग पदवी मिळवुन श्रीमंत बनावं असेच वाटते. बाकीच्या क्षेत्रात नोकरी करणे काय पाप आहे का ??
क्रिकेट :-
भारतात क्रिकेट हा खेळ नसुन धर्मच मानुन त्याची पुजा केली जाते ! लाखोंची सट्टेबाजी चालते ! भारतातील इतर अनेक खेळांना जगात डिमांड मिळते भारतात फक्त क्रिकेटच पाचवीला पुजलाय !
सोने -
जगात ज्या सोन्याचा सर्वांना कंटाळा येतो तेच सोने मिळवण्यासाठी भारतीय महिला जणु काय शपथच घेउन बैसल्यात ! त्याच सोन्याची भारतात जीवघेणी चोरी सुद्धा होते वा काय छान दुर्दैव आहे !
लोक काय म्हणतील ?
हे केले तर लोक काय म्हणतील... ते खाल्ले तर लोक काय म्हणतील... हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील.... अरे काय चाललय ?? लोकांच्या म्हणण्याने चालाल तर मुर्ख बनाल ! आत्महत्या करणारे पऩ हाच विचार करतात लोक काय म्हणतील ??? मी तर यांना आर्धवटच म्हणतो
बोर्डाची परिक्षा :-
जगात कुठे इतके महत्व दिले जात नाही येवढे भारतात बोर्डाच्या परिक्षेला महत्व दिले जाते ! किती तरी मुलं तर बोर्डाची परिक्षा ऐकुनच येवढे घाबरतात की ते परिक्षेला सुद्धा जात नाहीत
परदेशी ब्रँड : -
ज्या वस्तु परदेशात कचर्यात टाकुन दिल्या जातात त्या गोष्टी भारतात लाखों रुपये मोजिन खरेदी केल्या जातात ! जे पदार्थ परदेशात जनावरांना खायला देतात तेच पदार्थ भारतात कधी कधी माणसांच्या नावावर खपवले जातात... कसले हे दुर्दैव !
भारतातील ज्या इतिहासाचा जगात आदर्श घेतला जातो तोच इतिहास भारतात चुकीचा आणि खोटा सिद्ध केला जातो !
कमाल आहे राव...

पुरूषांनो, एव्हढं करून दाखवा !

एव्हढं करून दाखवा,
पुरुषांनो, एव्हढं करून दाखवा
दरवर्षी शब्दांची तीच फोलपटं सांडवण्यापेक्षा
आमच्यासाठी....एव्हढं करून दाखवा
एका तरी पुरूषाने... .सती जाऊन दाखवा
आवडत्या(?) बायकोसाठी
बघायचंय आम्हाला
खाली जाळ लागताच.... बुडाला
कसे येताय केकाटत; टुण्णदिशी उडी मारून
सरणावरून, पेटलेले बुड घेऊन
हात जोडत; ही रूढी बदलण्यासाठी
एक करून दाखवा
आपल्या लाडक्या(?) लेकीला
स्वतः जन्म देऊन दाखवा... एकदातरी पुरुषाने
बघायचंय आम्हाला
कसे बोंबलत ठणाणा; मरणप्राय कळांनी
सहन करताय ते....की उलट
हात जोडत रडताय...नशीबाजवळ
हा निसर्गनियम बदलण्यासाठी
एक करून दाखवा
ईतिहासात जाऊन... थोबाडीत मारून दाखवा
युधिष्ठीराच्या आणि... समस्त पुरूषी बिनडोकांच्या
पत्नीपेक्षा धर्म श्रेष्ठ; हे ढोंग उगाळल्याबद्दल
करून दाखवा शीर धडावेगळे; दु:शासनाचे
त्याचवेळी.... वस्त्रे पुरवण्यापेक्षा
बघायचीय; तुमची मर्दुमकी(?) आणि प्रेम
एक करून दाखवा
झोपला असाल किंवा नसाल.... कोणा दुसरीसोबत
तरी..... वनात जाऊन दाखवा; काही वर्षं तरी
किंवा अग्नीपरिक्षा..
धोब्याने सर्टीफिकेट दिले तरी; आमच्यासाठी
बघायचंय आम्हाला....तुमचा त्याग, समर्पण
तडफड; आमच्यासाठी
आणि, नसाल करू शकत हे
ढोंग्यांनो; तर बंद करा हे नाटक
भाट बनून, एका दिवसापुरते..... थोतांड!
दिनाबिनाचे..... नाही गरज आम्हाला
या गायपोळ्याची..... आमच्या जन्मजन्मांच्या जखमांवर
शब्दांची झूल पांघरण्याची
माहित आहे आम्हाला; आमचे मोठेपण, महती
आम्ही आहोत; समर्थ आता....जगण्यास, जगवण्यास
आणि एक करून दाखवा
हे शेवटचे;
टाका हा ईतिहास गाडून; टाका त्या पोथ्या जाळून
करा तर्पण मूर्ख रूढ्यांचे, जाळा मढे अक्कलशून्य परंपरांचे
आणि द्या साथ; आम्हाला एक मित्र म्हणून
जगण्याच्या समान हक्कासाठी
निदान एव्हढे तरी
कराल ना....
आमच्यासाठी?
कवी- उमेश कोठीकर .

स्त्रिया

एक स्त्री आपल्या पर्समधून एक फुटकळ नोट काढून कंडक्टरकडून घरच्या परतीचे तिकीट मागत आहे
तिच्यावर अगदी आत्ताच ,काही वेळापूर्वी झाला आहे बलात्कार
त्याच बसमध्ये एक दुसरी स्त्री आपल्यासारख्याच लाचार
समवयस्क दोन-तीन स्त्रियांशी
पदोन्नती आणि महागाई भत्त्याविषयी बोलते आहे
कार्यालयातील तिच्या वरिष्ठांनी तिला आज पुन्हा मेमो दिला आहे
एक स्त्री जिने अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी ठेवले आहे
करवा चौथचे निर्जल व्रत
ती पती वा सासूच्या हातून मारले जाण्याच्या भीतीने गाढ झोपेतूनच
किंचाळत उठते अचानक
एक स्त्री अर्ध्या रात्री बाल्कनीत उभी आहे बघत वाट
आपल्यासारख्याच असुरक्षित आणि असहाय कुण्या दुसऱ्या स्त्रीच्या घरून
परतणाऱ्या आपल्या दारुड्या नवऱ्याची
संशय-शंका , असुरक्षितता आणि भीतीने वेढलेली एक स्त्री मार खाण्याआधी
अतिशय दबल्या आवाजात विचारते आहे आपल्या नवऱ्याला की -
कुठे खर्च झाले तुमच्या पाकिटातल्या पगारातील अर्ध्यापेक्षा जास्त पैसे?
एक स्त्री आपल्या मुलाला आंघोळ घालताना रडू लागते उगीचच
हमसून हमसून
आणि मुके घेते त्याचे वेड्यासारखे पटापटा
आणि शोधू पाहतेय त्याच्या भविष्यात आपल्यासाठी एखादे शरणस्थळ
किंवा एखादी गुहा
एका स्त्रीचे हात पोळले आहेत तव्यात
एकीवर तेल पडले आहे कढईतले उकळते
इस्पितळात हजार टक्के भाजलेल्या स्त्रीचा कोळसा नोंदावातोय
आपल्या मृत्युपूर्व जबानीत की-कोणीही जाळले नाही तिला
तिच्याशिवाय बाकी सगळेच आहेत निर्दोष
अगदी चुकून तिच्याच हातून फुटले तिचे नशीब आणि भडकला स्टोव्ह
एक स्त्री नाकातून ओघळणारे रक्त पुसत बोलतेय
शपथ घेऊन सांगते ,माझ्या भूतकाळात कुठेच नव्हते प्रेम
तिथे होती एक पवित्र ,शतकांएवढी जुनाट धगधगती भयाण शांतता
ज्यात झिजत राहिला फक्त तुमच्याचसाठी माझा देह
एका स्त्रीचा चेहरा संगमरवरासारखा पांढराफटक
तिने कदाचित कुणालातरी सांगितले आहे आपले दु:ख किंवा तिच्या
हातून हरवला आहे एखादा दागिना
एक छताच्या वाशाला बांधते आहे ओढणी
तिच्या प्रियकराने सार्वजनिक केले आहेत तिचे फोटो आणि पत्र
एक स्त्री फोन पकडून रडतेय
एक स्वत:शीच बरळत कुठल्याशा भावनातिरेकात पळतच येते बाहेर
रस्त्यावर
अस्ताव्यस्त केसांसह , कोणत्याही कपड्यांविना
काही स्त्रिया बस स्थानकांवर किंवा रेल्वे फलाटांवर उभ्या आहेत विचारत
की त्यांना कोणत्या गाडीत बसून कुठे जायचे आहे या जगात
एक स्त्री हतबल होऊन म्हणते आहे की-तुला जे करायचे आहे माझ्याशी
ते कर पण मला कसं तरी जगू दे फक्त
एक सापडलीये मेलेली … शहराच्या अगदी गजबजलेल्या बागेत
आणि तिच्या शवापाशी बसून रडतो आहे तिचा दीड वर्षांचा मुलगा
तिच्या झोळीत मिळते दुधाची एक रिकामी बाटली ,
प्लास्टीकचा एक छोटासा पेला
आणि हिरव्या-पिवळ्या रंगाचा एक चेंडू
ज्याला हलवल्यावर आताही येतो आहे त्यातून
खुळखुळयासारखा आवाज
एक स्त्री जी यासिडने भाजली आहे,खूश आहे किमान वाचला आहे
तिचा उजवा डोळा
एक स्त्री तंदूर भट्टीत जळताना आपली बोटे हलवते आहे हळूहळू
ती चाचपून पाहते आहे बाहेरचा अंधार
एक फरशी पुसते आहे
एक भांडी घासते आहे
एक कपडे धूत आहे
एक मुलाला पोत्यावर झोपवून रस्त्यावर खडी पसरवते आहे
एक फरशी पुसता पुसता बघतेय राष्ट्रीय च्यानेलवरची फ्याशन परेड
एक वाचतेय बातमी की संसदेत वाढणार आहे त्यांची टक्केवारी
एका स्त्रीचं काळीज जे लप्पकन पोत्यातून पडलं आहे बाहेर
सांगतं आहे-फेकून कुठल्या तरी नाल्यात मला,लवकर परत ये
मुलांना शाळेसाठी उठवायचं आहे लवकर
नाश्ता त्यांना जरूर दे,कणिक मी मळूनच आले होते
राजधानीतल्या पोलिस चौकीच्या गेटवर बसल्यात दोन स्त्रिया जमिनीवर
एकमेकीला बिलगून गुपचूप
पण साऱ्या ब्रम्हांडात घुमतो आहे त्यांचा हाहाकार
हजारो लाख्खो दडून बसतात गर्भाच्या अंधारात
या जगात जन्म घ्यायला नाकारत
तिथेही त्यांना शोधून काढतात हेर ध्वनितरंग
तिथेही,जाते हत्यारी कट्यार स्त्री-अर्भकाच्या आरपार .

-उदय प्रकाश
अनुवाद-राहुल कोसंबी ,मुक्त शब्द एप्रिल २०१३' मधून

मुसलमान समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत

मुसलमान समाजात देखील खूप मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत आणि त्या अज्ञानापायी जोपासल्या जातात अनेक दर्ग्यात असले प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे एका बोटाने दगड उचलला जाणे होय, भक्तांनी केवळ आपले बोट लावले तरी तो दर्ग्यातला दगड उचलला जातो हा प्रकार करीम आली दर्ग्यात साताऱ्यात होत होता त्याची पोलखोल शेवटी अंनिस ने केली.. त्यात सामील असणारे बदमाश मात्र दगडाला बळ लावत असतात आणि भक्ताला वाटते केवळ एका बोटाने मोठा दगड उचलला जातोय... हीच आहे भोंदुगिरी..
अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहेत... हल्ली प्रबोधानात जो निकष हिंदू धर्माला लावला जातो... तो इतर कूठल्या धर्माला लावला जात नाही त्यामुळे एका धर्मातील अंधश्रद्धेबद्दल बोलणं बरोबर नाही.. जेव्हा शिकलेला माणूस अशा गोष्टीवर श्रध्दा ठेवतो तेव्हाच ती अंधश्रद्धा होते.. चिकीत्सा ही सर्व धर्मांची झाली पाहीजे... जसे आपण हिंदू धर्मपुराणकथा, हे सर्व थोतांड आहे असे म्हणतो... अश्याच प्रकारचे थोतांड हे मुस्लीम-खिश्चन इतर धर्मात आहे.. त्याविरूद्ध बोलण्याची धमक सुद्धा आपणात असावी.. अन्यथा हे बेगडेपणच ठरेल...

अंधश्रद्धा सर्वच धर्मात आहे. कट्टरता देखील सर्वच धर्मात आहे. पण प्रत्येकाला वाटत की आपल्या धर्मातील अंधश्रद्धा फारशी घातक नाही पण दुसऱ्या धर्मातील अंधश्रद्धा मात्र फार घातक आहे त्यामुळे बहुतेक जण दुसऱ्या धर्मातील अंधश्रद्धेवर बोलतो.. माझाच धर्म सर्वश्रेष्ठ ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा !!
Dr tambe, Sattar Shaikh, sakya nitin, vaibhav kokat, nikesh jithe.

ताराबाई बापूजी शिंदे (१८५० - १९१०)

स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्धपणे वेध घेणारी, स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्टपणे मांडणारी एकोणिसाव्या शतकातील विचारवंत स्त्री म्हणून ताराबाई शिंदे परिचित आहेत. विधवांच्या प्रश्नांविषयी, पुनर्विवाहाविषयी आणि एकूणच त्या काळातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी अतिशय कणखर भाषेत मांडलेले विचार 'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथातून १८८२ साली प्रसिद्ध झाले. काळाच्या बरंच पुढे जाऊन केलेलं, पुरुषी मानसिकतेवर घाव घालणारं त्यांचं हे लेखन त्या काळात प्रचंड खळबळ माजवणारं ठरलं. स्त्रीशिक्षणाचा फारसा प्रसार न झालेल्या त्या काळात ताराबाई शिंदे यांच्यासारख्या मराठा समाजातील एका स्त्रीने समाजाच्या ज्वलंत प्रश्नासंबंधी इतक्या परखडपणे आपले विचार या ग्रंथातून मांडावेत, ही अपवादभूतच कृती होती.
ताराबाई शिंदे यांचा जन्म वऱ्हाड(विदर्भ) प्रांतातील बुलठाणी(बुलढाणा) येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे श्रीमंत जमीनदार होते, तसेच ते डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयात हेडक्लार्कची नोकरीही करत होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या 'सत्यशोधक समाजा'चेही ते कार्यकर्ते होते. त्यामुळे या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची त्यांच्या घरी ऊठबस असायची. बापूजी शिंदे यांना ताराबाई ही एकुलती एक कन्या आणि चार पुत्र होते. जन्मजात बुद्धिमान असलेल्या ताराबाई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. त्या काळाचा विचार करता ताराबाईंना त्यांच्या वडिलांनी चांगल्यापैकी शिक्षण दिल्याची नोंद आहे, पण त्यांचं नक्की शिक्षण कितपत झालं याची माहिती उपलब्ध नाही. ताराबाईंना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांचं उत्तम ज्ञान होतं. त्यांचं वाचन चौफेर होतं. त्या काळातली महत्त्वाची मराठी, इंग्रजी वृत्तपत्रं त्या नियमितपणे वाचत असत. महाकाव्यं, संस्कृत नाटकं, धर्मग्रंथ, काव्यग्रंथ यांचंही त्या भरपूर वाचन करीत. या वैविध्यपूर्ण वाचनामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या, प्रगल्भ होत गेल्या.
ताराबाईंना लग्न करायची फारशी इच्छा नव्हती, परंतु त्या काळच्या चालीरीतींना अनुसरून त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न ठरवून त्यांना घरजावई आणला. पण थोड्याशा अनिच्छेनेच केलेल्या या विवाहामुळे ताराबाईंना संसारसुख काही मिळालं नाही. त्यांना मूलही झालं नाही. त्यातच त्यांचं घराणं खानदानी असल्यामुळे त्यांच्याकडे गोषापध्दती होती. ती मात्र त्यांनी जुमानली नाही. कारण मुळातून त्या करारी, धाडसी आणि निर्भीड स्वभावाच्या होत्या. गावात आणि परिसरात त्यांचा दरारा होता. कोर्टकचेरीच्या कामासाठी त्या घोड्यावर बसून जात असत. शेतीचीही देखभाल त्या करीत. उत्तरायुष्यात त्यांना वैधव्य प्राप्त झालं; पण त्या काळातल्या प्रथेप्रमाणे 'सांदीचं खापर' होऊन जगण्याचं त्यांनी नाकारलं. अशा त्यांच्या धाडसी कृत्यांना त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला.
दरम्यानच्या काळात सुरत येथील विजयालक्ष्मी नामक ब्राह्मण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला म्हणून सुरत न्यायालयाने या विधवेला फाशीची शिक्षा सुनावली होती. तिने मुंबई न्यायालात अपील केल्यानंतर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राच्या २६ मे १८८१ रोजीच्या अंकातील ही बातमी आणि त्यानंतर 'पुणेवैभव'सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी स्त्रीजातीविरुद्ध उठवलेली टीकेची झोड या गोष्टी ताराबाईंना 'स्त्री-पुरुष तुलना' अथवा 'स्त्री आणि पुरुष यांत साहसी कोण' हे स्पष्ट करून दाखविणारा निबंध लिहिण्यासाठी निमित्त ठरल्या. नोव्हेंबर-डिसेंबर १८८१ मध्ये त्यांनी लेखनाला सुरुवात केली, आणि पुढे १८८२ मध्ये पुण्यातील शिवाजी छापखान्यात छापून हा बावन्न पानी निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. हे पुस्तक प्रकशित होताच तत्कालीन समाजात एकच खळबळ उडाली. भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवर स्त्रियांच्या व्यथा-वेदनांना प्रथमच वाचा फोडणाऱ्या या ग्रंथावर त्या काळातल्या सनातनी विचारांच्या लोकांनी टीकेची प्रचंड झोड उठवली; पण थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८८५ मध्ये 'सत्सार'च्या दुसऱ्या अंकात या ग्रंथावर विस्तृत लेख लिहून ताराबाईंच्या विचारांचं जाहीर समर्थन केलं.
वरील विधवेची शोकांतिका ताराबाईंना हा ग्रंथ लिहिण्यासाठी निमित्त ठरली असली, तरी या निमित्ताने एकूण स्त्रीजातीवर घेतल्या जाणाऱ्या अनेक आक्षेपांचं खंडन करण्याच्या व्यापक हेतूनेच त्यांनी लेखणी उचलली, हे त्यांच्या या ग्रंथासाठी त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून स्पष्ट होतं. त्यात त्या म्हणतात, ''…रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असताही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात, हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून, तळतळून गेले. त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून राहवेना.'' कोण्या एखाद्या स्त्रीच्या हातून एखादा प्रमाद घडला की तिच्यावर अनेक कुत्सित आक्षेप घेण्याच्या व बायका या जात्याच घातकी आणि निसर्गत:च अनैतिकतेकडे कल असणाऱ्या असतात, असे ताशेरे झोडणारी त्या काळच्या समाजव्यवस्थेतील पूर्वापार चालत आलेली वृत्तीच सनातनी वृत्तपत्रांतील टीकेच्या रूपाने प्रकट झाली होती. या निबंधात ताराबाईंनी या वृत्तीचा परखड शब्दांत समाचार घेतला. स्त्रियांना दिले जाणारे सारे दोष स्त्रियांपेक्षा पुरुषांतच कसे जास्त आहेत आणि काही स्त्रियांत असे दोष आढळले तरी ते पक्षपाती शास्त्रनिर्बंधांमुळे, निर्दयी रूढींमुळे आणि प्रचलित पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळेच कसे निर्माण झाले आहेत हे त्यांनी या ग्रंथात स्त्री आणि पुरुष यांची पदोपदी तुलना करून सप्रमाण मांडले. बाईचं पाऊल वाकडं पडतं याला पुरूषच बहुधा जबाबदार असतात, असा युक्तिवाद करताना त्या म्हणतात, ''टाळी एका हाताने वाजत नाही, पण त्यातून उजवे हाताचा जोर जास्त असतो.''
पुनर्विवाहाविषयी त्यांनी म्हटलंय, ''पुनर्विवाह न करण्याची चाल महारोगाप्रमाणे अनेक ठिकाणी व जातींत पसरली आहे. त्यामुळे किती लाखो व कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दु:ख कसकसे भोगीत असतील व भोगतील व त्यापासून कसकसे अनर्थ होत आहेत व होत असतील याची कल्पनासुद्धा करिता येत नाही.'' वैधव्य आलेल्या स्त्रीचं दु:ख मांडताना त्या पुढे म्हणतात, ''वैधव्याचे गाठोडे पदरात बांधून आपल्या भर्त्याचे गुण-अवगुण वाणीत व सर्व घरच्या-दारच्यांचा जाच काढीत मरून जातात.'' पुनर्विवाहबंदीमुळे तरुण विधवांचे पाऊल वाकडे पडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भृणहत्या घडताहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत किमान एक हजार भृणहत्या होत असाव्यात असा अंदाज त्या काळात लोकहितवादींनी सरकारकडे पाठवलेल्या एका पत्रात व्यक्त केला होता. ताराबाई शिंदे यांनी व्यक्त केलेल्या भीतीला लोकहितवादींच्या या पत्रामुळे बळकटीच मिळते.
पुनर्विवाहबंदी तर्काला आणि वास्तवाला धरून कशी नाही हे स्पष्ट करताना त्या विचारतात, ''अरे, नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायकोआधी मरावे याचा तुमच्या बापजाद्यांनी देवांपासून काही दाखला आणला काय रे? मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाचे हाती.'
'एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुण्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर आंधारकोठडीत राहावे?' हे त्यांना मान्यच नाही. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत अस्तित्वहीन झालेल्या स्त्रीला जगणं कसं अवघड होऊन बसलंय याविषयी त्यांनी अनेक मुद्दे या ग्रंथात मांडले आहेत. ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे असे सांगून न थांबता इंग्रज सरकारने विधवा पुनर्विवाहाचा कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
स्त्रीविषयी असलेल्या जातिवंत पोटतिडकीतूनच त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून ताराबाई शिंदे यांची बहुश्रुतता, समतोल विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन प्रकर्षाने समोर येतात. या ग्रंथात पोथ्या-पुराणांतील अनेक दाखले त्यांनी खऱ्याखोट्याची पारख करून, चिकित्सा करून दिले आहेत. यावरून ताराबाईंच्या चौफेर आणि चौरस वाचनाचा प्रत्यय येतो. त्या काळातल्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्याही त्यांनी डोळसपणे वाचल्या होत्या. त्यातील पुरुषी मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या 'मुक्तामाला', 'मंजुघोषा', 'मनोरमा', 'विदग्ध स्त्रीचरित्र' आदी पुस्तकांत आलेल्या स्त्रियांच्या कामविव्हल प्रतिमाचित्रणावर त्यांनी आक्रमक हल्ले चढवले. त्यातील वर्णनं काल्पनिक, अवास्तव आणि स्त्रियांची बदनामी करणारी आहेत, असं परखड मत त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलं.
'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथात ताराबाई शिंदे यांनी वापरलेली भाषा आक्रमक आणि परखड असली तरी स्त्रीस्वातंत्र्याचा किंवा स्त्री-पुरुष समानतेचा अनिर्बंध पुरस्कार त्यांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे पुरुषांना एकांगी दोषही दिलेला नाही.
या ग्रंथाची शैली अतिशय ओघवती आहे. या लिखाणाला परिणामकारकता आली आहे ती त्यांच्या जीवनानुभवाच्या परिघातीलच उपमानसृष्टीमुळे आणि त्या काळात स्त्रियांच्या तोंडी प्रसिद्ध असलेल्या अनेक लयदार म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर केल्यामुळे. 'स्त्री-पुरुष तुलना' या मौलिक ग्रंथामुळे मराठीतील आद्य स्त्री लेखिका होण्याचा बहुमान मिळवलेल्या, लेखनाचे सुप्त गुण असलेल्या ताराबाई शिंदे यांनी नंतरच्या काळात काहीच लेखन कसं केलं नाही, हा प्रश्न मात्र अनाकलनीय आहे.
अधिक वाचनासाठी –
१. ताराबाई शिंदे-लिखित स्त्री-पुरुष तुलना (संपादक – विलास खोले), प्रतिमा प्रकाशन
२. ताराबाई शिंदे-कृत स्त्री-पुरुष तुलना (संपादक – डॉ. स. गं. मालशे), मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
लेखन - महेंद्र मुंजाळ, युनिक फीचर्स.

सलाम अशा शिक्षकांना

रात्रशाळेत उजेड आणता-आणता ‘त्यांच्या’ आयुष्यात काळोख!
शाळेचे मुख्याध्यापक, क्लार्क अन् साफसफाई करणारे शिपाईही तेच, अशी तिहेरी भूमिका पार पाडणारे महापालिका रात्रशाळेतील प्रभारी मुख्याध्यापक एस. एच. काझी हे गेल्या २० वर्षांपासून २३९६ रुपये इतक्या तुटपुंज्या पगारावर राबत आहेत. सध्या शासनाच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपड सुरू आहे; तर दुसरीकडे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणारे काझी यांची मात्र महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे परवड होत आहे.
कोल्हापुरात १९६१ मध्ये महापालिकेच्या राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या इमारतीत कर्मवीर भाऊराव पाटील रात्र प्रशालेची सुरुवात झाली. येथे आठवी ते दहावीपर्यंत सायंकाळी सात ते दहा वेळेत वर्ग भरतात. या शाळेत १९९५ ला एस. एच. काझी हे सहायक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी शासनाच्या अनुदानासह आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगली होती. एक मुख्याध्यापक, पाच शिक्षक, एक लिपिक, दोन शिपाई असा स्टाफ होता. मात्र, या शाळेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. शाळेच्या खर्चाचे वेळेत कधी लेखापरीक्षणच केले गेले नाही. त्यामुळे अनुदानाची रक्कम जमा होणे बंद झाले. सर्व गोष्टींवर याचा परिणाम होऊ लागला. यादरम्यानच काही शिक्षक, लिपिक व शिपाईही निवृत्त झाले.
पर्यायाने २००८ ला एस. एच. काझी यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते शाळेत एकमेव उरल्याने त्यांच्यावरच कामांची सर्व जबाबदारी आली. आपण शाळा सोडून गेलो तर शाळाच बंद पडणार, ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी गेली आठ वर्षे पडेल ते काम करीत शाळा टिकविण्यासाठी धडपड सुरू केली. त्यांनी प्रथम शाळेचे लेखापरीक्षण करून घेतले. त्यामुळे २८ लाखांचे अनुदान मंजूर झाले. मात्र, अनुदान घेण्यासाठी लागणाऱ्या काही अटींची पूर्तता महापालिका प्रशासनाने न केल्यामुळे अनुदान शाळेला मिळालेच नाही. महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने काझी नियमित महापालिका प्रशासनाकडे अनुदानाच्या अटींची पूर्तता करण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र, त्यांची कोणीच साधी दखलही घेत नाहीत. यावर्षीच्या सुरुवातीपासून (२९ जानेवारी २०१५) सुभाषनगर येथील संत रोहिदास विद्यामंदिर येथे ही शाळा भरत आहे.
या शाळेत सध्या २२ विद्यार्थी आहेत. ८ वीमध्ये ६, ९वीमध्ये ११ व १० वीमध्ये ५ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये हॉटेल, सेंट्रिंग कामगार व रिक्षाचालकांचा समावेश आहे. १९९४-९५ पर्यंत प्रत्येक वर्गात सरासरी ३८-४० विद्यार्थी असायचे. २०१०-११ दरम्यान ही संख्या १५ ते १६ वर येऊन थांबली. शिक्षकांची संख्या कमी झाल्याने विद्यार्थी संख्याही घटत गेली.
काझी यांनी मराठी, हिंदी आणि समाजशास्त्र या तीन विषयांतून एम.ए. पूर्ण केले आहे. तसेच एम. एड., एम. फिल. या पदव्युत्तर पदव्याही घेतल्या आहेत. तसेच पुणे येथून ‘हिंदी पंडित’ ही पदवीसुद्धा त्यांनी घेतली आहे. तरीही काझी यांना गेली वीस वर्षे महिन्याला फक्त दोन हजार ३९६ रुपये इतकाच पगार मिळतो. शाळा उघडण्यापासून ती झाडणे, विद्यार्थ्यांना शिकविण्यापासून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याचे काम ते एकटेच करीत आहेत.
काझी शाळेच्या अनुदानाच्या कामासाठी जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेतील कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर त्यांची ‘नाईट स्कूल आले’ असे संबोधून टर उडविली जाते. मात्र, काझी यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, गरीब विद्यार्थ्यांना काम करता-करता शिकता यावे, याच मुख्य हेतूने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आपले काम सुरूच ठेवले आहे.
समाजातील वंचित व उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही रात्रशाळा सुरू आहे. या ठिकाणी मी एकटाच शिक्षक कार्यरत आहे. शासनाचे अनुदान मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाची दारे ठोठावली; मात्र कोणीच माझी दखल घेत नाही.
- एस. एच. काझी, प्रभारी मुख्याध्यापक
प्रदीप शिंदे- कोल्हापूर ( लोकमत )

मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र हरवल्यास त्याची डुप्लिकेट कॉपी कशी मिळवावी?

सध्या विविध कामांसाठी आपल्याला पदवी अभ्यासक्रमाची मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र आवश्यक असते. कधी नोकरीसाठी तरी कधी अन्य कामांसाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. पण अनेक वेळा जुनी मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र गहाळ झालेली असते. अशावेळी ही गहाळ मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र नेमके कसे मिळू शकते, हा प्रश्न आपल्याला नेहमी सतावतो. नवीन मार्कशीट कशी मिळवायची किंवा पदवी प्रमाणपत्र कसे काढायचे, त्याबद्दल जाणून घेऊ या हेल्पलाइनद्वारे...
कशी मिळेल मार्कशीट...
मुळात एखाद्या विद्यार्थ्याची मार्कशीट हरविली अथवा गहाळ झाली असेल, तर त्यासाठी प्रथम त्या विद्यार्थ्याला नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. त्यानंतर हरविलेली मार्कशीट नेमकी कशी हरविली किंवा नेमके काय झाले, यासंदर्भात विद्यार्थ्यांना ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर हे दोन्ही कागदपत्रे घेऊन संबंधितांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. याठिकाणी यासंदर्भात एक फॉर्म उपलब्ध असून, त्या फार्मसोबत एफआयआर आणि प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे सादर करावी. हा अर्ज सादर केल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना मार्कशीटची दुसरी प्रत उपलब्ध होते. ही दुसरी मार्कशीट देताना त्या विद्यार्थ्यांच्या निकालाची सर्व माहिती विद्यापीठाकडून पुन्हा एकदा तपासून मगच ती दिली जाते.
येणारा खर्च....
मुळात नवी मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र
मिळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ काही फी आकारते. संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र जितके जुने असेल, तितकी फी आकारली जाते. यासाठी कोणतेही ठराविक शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून, संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र किती जुने आहे, यावर ते ठरविण्यात येते. कसे मिळेल नवे पदवी प्रमाणपत्र एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची मार्कशीट आणि पदवी प्रमाणतपत्र वेळेनुसार विद्यापीठाकडून कॉलेजात पाठविण्यात येते. मात्र अनेक वेळा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रारही पुढे येते. या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात संपर्क साधल्यास त्यांना नवे पदवी प्रमाणत्र मिळू शकते. त्यासाठी एक विशेष अर्ज विद्यापीठाकडून भरून घेतला जातो. या अर्जासाठी विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
कसे मिळेल पदवी प्रमाणपत्र...
मुळात हरविलेली किंवा गहाळ झालेली मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत जवळपास एकसमानच आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील एफआयआरची प्रत आणि प्रतिज्ञापत्रासह नव्या पदवी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज भरावा लागतो. साधारणपणे २५ दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाते. पदवी प्रमाणपत्रांचे हे प्रमाणपत्र जेवढे जुने असेल तेवढे ते मिळण्यास उशीर लागतो. मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग विद्यार्थ्यांची सोय आणि वाढते कम्प्युटरायझेशन लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने नॅशनल अकॅडमिक डिपोझटरी योजना म्हणजे, मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग सुरू करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आता गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सुरक्षितरित्या ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. सीडीएसएलच्या माध्यमातून शैक्षणिक कागदपत्रांचे जतन केले जात आहे. कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट लिंक उपलब्ध होणार असून लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना ती कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे गुणपत्रिकांवर डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. जेणेकरून पडताळणी करणे सोपे जाईल.
कशी असणार डिमॅट पद्धत...
या माध्यमातून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
झाल्यावर नॅशनल अकॅडमिक डिपोझिटरीमध्ये माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर हा सर्व डेटा डिजिटल स्वाक्षरीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि त्याची एक लिंक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार असून, मार्कशीटवर परीक्षा नियंत्रकाची डिजिटल स्वाक्षरी असेल. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित संस्थेतर्फे ईमेल पाठवला जाईल.
Thank u- सौरभ शर्मा हेल्पलाइन

देवाला सोडलेला 'मरीबा पोतराज' बनलाय लालासाहेब..

उस्मानाबाद : स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिलाय. पोतराजांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेनं पुढाकार घेतलाय. पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम संघटनेनं राबवलाय.
सामान्यांचं जगणं नाकारणारी पोतराज प्रथा... पुत्रप्राप्तीच्या नवसापोटी देवीच्या नावानं सोडलेला मुलगा म्हणजे पोतराज... कपाळावर हळद, कुंकवाचा मळवट, तोंडाला शेंदूर, कंबरेला विविध रंगांच्या कपड्याच्या चिंध्या... पायात विशिष्ट पद्धतीचा चाळ आणि डोक्यावर वाढलेले केस अशा अवतारात
पोतराज आपल्यासमोर येतो... स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा असा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिला असेल... पण आसुडाच्या फटक्यांमुळे होणाऱ्या जखमाही त्याला पोटभर अन्न देऊ शकत नाही. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव... देवीच्या कोपाच्या भितीमुळे त्यातून बाहेरही पडता येत नाही... म्हणूनच पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम मानवी हक्क अभियान संघटनेनं राबवलाय. पोतराज निर्मूलनाचे उद्देश, मातंग समजात पोतराज प्रथेच प्रमाण जास्त आहे. त्यानं हे अपमानित जगणं सोडावं म्हणून, या प्रथेतून बाहेर पडावे हाच या पोतराज निर्मुलन अभियानाचा उद्देश आहे, असं संघटनेचे कार्यकर्ते बजरंग ताटे
सांगतात.
उस्मानाबादमधल्या मरीबा लक्ष्मण डोंगरेलाही मानवी हक्क अभियान संघटनेनं नवीन आयुष्य दिलंय. खरं तर मरीबाला शाळेची खूप आवड... पण डोक्यावरचे लांबसडक केस पाहून वर्गातली मुलं त्याला चिडवायची... रस्त्यावर येता-जाता त्याला टोमणेही मारायची. त्यामुळे सहावीच्या वर्गातून मरीबानं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याची कुठलीही चूक नसताना केवळ आई- वडिलांनी देवीला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याला पोतराज म्हणून देवीला सोडलं होतं. 'शाळेमध्ये गेलो की मुले चिडवायची, दगड मारायची. केसं मुळ लाज वाटायची. मग, दोन वर्ष शाळा बुडाली' असं मरीबा डोंगरे सांगतो...
तर, माझ्या पत्नीला या मुलाच्या जन्माच्या वेळी खूप त्रास होत होता, त्यावेळी मी लक्ष्मी देवीला नवस बोलला होता कि जो मुलगा होईल तो देवीला पोतराज म्हणून सोडला जाईल. म्हणून आम्ही मुलाची केस वाढवली आणि पोतराज म्हणून सोडलं, आता केसामुळे त्याला मुले चिडवायची. त्याने दोन वर्षा पासून शाळा सोडली. त्याला तिथं इतर मुलं त्रास देत होती, असं मरीबाचे वडील लक्ष्मण डोंगरे सांगतात.
मानवी हक्क अभियान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मरीबाचं आणि त्याच्या पालकांचं प्रबोधन केलं... आणि त्याचे केस कापले. त्याचं मरीबा नाव बदलून लालासाहेब असं ठेवलं... आज त्याच्या आयुष्याला नवी ओळख मिळालीय. 'आता खूप चांगल वाटतेय, फ्रेश वाटतेय, २ वर्ष बुडालेली शाळा भरून काढणार, अधिकारी होणार' अशी स्वप्न रंगवण्यात लालासाहेब व्यस्त आहे. अशिक्षित, गरीब आणि मागासलेल्या समाजात, अंधश्रद्धा आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचं अस्तित्वच मिटवायचं असेल तर प्रबोधनानं मानसिकता
बदलण्याची मोठी गरज आहे.
Thank u.. झी २४ तास

गाव

कुटुंबाच्या आदमुसल्या दमाने
अन झरनाऱ्या घामाने
घरचा पोरगा शिक्षण घेतो,
आधी करतो
परिवर्तनाचा जयघोष
विषमतेविरुद्ध आक्रोश.
बाबासाहेबांच्या आधाराने
तो साहेब होतो
आणि गावाला कायमचा निरोप देतो.
आजन्म घामात भिजलेली
अन फाटक्या गोधडीत निजलेली
माय त्याची वाट पाहते.
मोडक्या कुडांना आधार देता देता
बाप मोडून पडतो,
तो मात्र बिझी असल्याचा निरोप धाडतो.
त्याची शिकलेली बायको
गावात येत नाही,
अन सोफीस्टीकेटेड नातवंड
आजीचे नावही घेत नाही.
सुख दु:खाच्या
एखाद्या अनिवार्य प्रसंगी
लाजी खातर तो गावात येतो
तुटलेल्या सवंगड्याच्या
फाटलेल्या जिंदगीवर
तो मारतो शेरा
अन उगाच मिरवतो
शहरात बांधलेल्या बंगल्याचा तोरा
तेंव्हा बाजूच्या बुढयाला
बोलण्याची उबळ येते
सात्विक संतापाने त्याचे ओठ हलते
जणू त्याच्या वाणीने सारेच गाव बोलते.
आगा, गावाच्या घराचे जरा हाल पाय
मजुरी करत जगते तुही थकलेली
माय..
जवान बहिण आणखी उजवाची हाये.
कर्जाचे सारेच उखीर बुजवायचे हाये.
तुह्यासाठीच सुटली तुह्या भावंडाची
शाळा..
आन पुतण्याच्या हाती आला
निन्द्ण्याचा इळा..
सोपं असतं गड्या देणं
समतेवरचं भाषण,
तुमच्या सारख्या आवलादीनच
हा मोहला झाला मसन.
आरे, परिस्थितीन आमी
कफल्लक असलो तरी
बाबासाहेबाच्या इचाराचे
सच्चे पाईक हाओत,
आन तुमचा आवाज मोठा करणरे
आमीच माईक हाओत...
कवी- हेमंतकुमार कांबळे
('गाव' या दीर्घ कवितेतून)
धन्यवाद- प्रशांतजी वंजारे सर

कसं वाटत असेल?

पायाला ठेच लागली, जीव किती तळमळतो
दगडांनी ठेचून मारतात... कसं वाटत असेल?
साधा चटका बसला, जीव किती चरफडतो
साले जिवंत जाळून मारतात... कसं वाटत असेल?
बोटाला सुई टोचली, माणूस किती कळ्वळतो
सुरे-तलवारी खसाखस भोसकतात... कसं वाटत असेल?
नकळत पदर ढळला, बाई किती शरमते
नग्न धिंड काढतात... कसं वाटत असेल?
किती अपमान, किती अवहेलना,
किती यातना, किती वेदना... कसं सोसत असेल?
किती काळ हे असंच चालायचं?
किती काळ सारं निमूट झेलायचं?
आता ठरवलंय... ठेवलेलं हत्यार खोलायचं
माणसातलं जनावर आरपार सोलायचंच
करायचीच माणसं आतून बाहेरुन शुद्ध
अन जागवायचा आता प्रत्येक माणसात
एक बुद्ध... एक बुद्ध... एक बुद्ध...
कवी-बबन सरवदे
काव्यसंग्रह-आता सुर्यच आमचा आहे

किमान खर्चांमध्ये कमाल संरक्षण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने गेल्या काही दिवसात अनेकविध योजना सादर केल्या आहेत. या योजनांमध्ये दोन विमाविषयक योजनांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातील लोकांना या योजना आपल्याशा वाटत नसतीलही; मात्र अल्प उत्पन्न गटातील लोकांचे भविष्य साकारण्यासाठी या योजना वरदान ठरतील, यात शंकाच नाही.

अटल पेन्शन योजना

लाभ काय : प्रति महिना ₨ १,००० ते ५,००० पेन्शन

किती खर्च : चाळीस वर्षाच्या प्रौढ व्यक्तीला प्रति महिना १,००० रुपयांच्या पेन्शनसाठी वीस वर्षे दरमहा २९१ रुपये गुंतवावे लागतील. मात्र, अठरा वर्षाच्या व्यक्तीला चाळीस वर्षांसाठी दरमहा ४२ रुपये गुंतवावे लागतील. 

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानची व्यक्ती, वय वर्षे साठपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना प्रामुख्याने तुमच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ठरा​विक वर्षांनी काम सोडल्यानंतर अशा व्यक्तींकडे पाहणारे दुसरे कोणी नसते.


पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

लाभ काय : अपघाती विमा आणि दोन लाखांपर्यंत अपंगत्व विमा.

किती खर्च : वार्षिक १२ रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : ही योजना असणाऱ्या कोणत्याही बँकेत बचत खाते असणारी व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना सर्वांसाठी उपयुक्त आहे. विशेष करून ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, वृत्तपत्रविक्रेते, फळ-भाजीपाला विक्रेते. शिवाय ज्या व्यक्ती जिवावर उदार होऊन कामे करतात, त्यांच्यासाठी ही योजना अतिउपयुक्त.


पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

लाभ काय : पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर वारसदाराला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण.

किती खर्च : वार्षिक ३३० रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ७० दरम्यानची कुणीही व्यक्ती; जिचे बँकेमध्ये बचत खाते आहे.

कोणासाठी उपयुक्त : तुमच्याकडे कार्यरत कुणीही नोकरदार.. ज्याच्या कुटुंबातील एकमेव कमविणारी व्यक्ती ती स्वतः आहे. तिच्यावर अथवा त्याच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे.


पंतप्रधान जनधन योजना

लाभ काय : झीरो बॅलन्सचे बचत खाते मिळते, खातेधारकाला 'रुपे डेबिट कार्ड' मिळते, शिवाय एक लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा आणि तीस हजार रुपयांपर्यंतचा जीवनविमा.

किती खर्च : शून्य

अर्हता काय : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुणीही. भविष्यातील सर्व कल्याणकारी आणि अनुदानाशी संबंधित योजनांसाठी अत्यंत उपयुक्त योजना असल्याने तुमच्या नोकरदारांना अवश्य लाभ करून द्यावा.

कोणासाठी उपयुक्त : असंघटित क्षेत्रात कार्यरत प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त. तुम्ही तुमच्या नोकरदारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकता. त्यांना बँकेच्या व्यवहारांची माहिती देण्यासाठी उपयुक्त.


आरोग्यविमा योजना

लाभ काय : आजारी पडल्यामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे होणारे हॉस्पिटलायझेशनचे सर्व खर्च भरून निघतात.

किती खर्च : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानच्या व्यक्तीसाठी ५०,००० रुपयांपर्यंतच्या संरक्षणासाठी वार्षिक ७०० ते ८०० रुपयांचा प्रिमियम.

अर्हता काय : सर्वचजण पात्र.

कोणासाठी उपयुक्त : आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्यांना वैद्यकीय खर्च परवडत नाहीत. आयुष्यभराची पूंजी हॉस्पिटलवर खर्च करण्याची वेळ आलेल्यांसाठी योजना उपयुक्त.


सुकन्या समृद्धी योजना

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ९.२ टक्के दराने परतावा.

किती खर्च : किमान वार्षिक गुंतवणूक ₨ १,०००, कमाल वार्षिक गुंतवणूक ₨ १,५०,०००

अर्हता काय : दहा वर्षांखालील मुली

कोणासाठी उपयुक्त : घरकाम करणाऱ्या बहुतांश घरकामगार मुलींना शिकवण्याऐवजी संसाराला हातभार म्हणून कामाला जुंपतात. मुलीच्या नावे पैसे गुंतवल्यास तिचे शिक्षण आणि लग्न यासाठी काही रक्कम टप्प्याटप्याने दिली जाते.


किसान विकास पत्र

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.७ टक्के दराने व्याज आणि शंभर महिन्यांमध्ये ठेव रक्कम दापदुप्पट मिळण्याची खात्री.

किती खर्च : किमान एक हजार रुपयांची ठेव ठेवावी लागते. कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : कुणीही.

कोणासाठी उपयुक्त : सर्व वयोगटातील घरकामगार, वृत्तपत्रविक्रेते, मध्यम उत्पन्न गटातील कुणीही, अल्पकालीन गुंतवणुकीची इच्छा असणाऱ्यांसाठी.


टपाल खाते, बँकांच्या मुदत ठेवी

लाभ काय : एक ते चार वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर वार्षिक ८.४ टक्के दराने व्याज, पाच वर्षांच्या मुदतठेवींवर साडेआठ टक्के दराने व्याज, वयोवृद्ध घरकामगाराच्या अथवा ज्येष्ठ नागरिकांच्या नावे पैसे गुंतवल्यास वार्षिक ९ ते ९.२५ टक्के दराने व्याज मिळण्याची हमी.

किती खर्च : टपाल खात्यामध्ये गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा ₨ २००, ​कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : आधार कार्ड किंवा बँक खाते असणारी कुणीही व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : घरकामगारांच्या अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त योजना. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी घरांचे डाउन पेमेंट करण्यासाठी, कोचिंग क्लासेसची फी भरण्यासाठी उपयुक्त रक्कम जमविण्यासाठी.


सर्वच योजनांचा एकत्रित वार्षिक हप्ता... (तुमच्याकडे कार्यरत घरकामगार महिला अथवा पुरुषाचे वय ४० वर्षे असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. ती व्यक्ती मासिक १,००० रुपयांच्या पेन्शन योजनेत सहभागी झाल्याचे गृहित धरण्यात आले आहे.)

पंतप्रधान जनधन योजना ० + पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ₨ ३३० + पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ₨ १२ + अटल पेन्शन योजना ₨ ३,४९२ + आरोग्य विमा ₨ ८०० + सुकन्या समृद्धी योजना ₨ १,००० + किसान विकास पत्र ₨ १,००० + टपाल खाते, बँक ठेवी ₨ २०० = ₨ ६,८३४.

अग्निपुत्र : भाग ६

‘‘जॉर्डन, गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून फोन आलाय.’’ डॉ.मार्को म्हणतो.

‘‘गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून फोन?’’ जॉर्डन आश्चर्याने विचारतो.

‘‘हो. लगेच घे नाहितर कट होईल.’’ डॉ.मार्को जॉर्डनच्या हातात मोबाईल देतो.

‘‘हॅलो...’’ जॉर्डन म्हणतो.

‘‘आपण जॉर्डन बोलत आहात?’’ मोबाईलवर समोरुन दुसरी व्यक्ती बोलते.

‘‘हो...’’ जॉर्डन

‘‘मी गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून गुप्ता बोलतोय.’’

‘‘हो... ओळखलं मी... मोहिमेवर येत असताना माझं आपल्याशी एकदा बोलणं झालं होतं...’’

‘‘अगदी बरोबर ओळखलंत... कृपया आपण सांगू शकाल, आपण सध्या कुठे आहात आणि आपल्यासह आपले साथीदार सुखरुप असतील अशी आशा करतो.’’

‘‘आम्ही ८६ रोडजवळ आहोत आणि सर्वजण सुखरूप आहोत. काही झालं का?’’

‘‘हिमालयामध्ये ३.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली असून अनेक गावं जमिनीखाली गाडली गेली आहेत. मोकळ्याा मैदानामध्ये सुरक्षित ठिकाणी उभे रहा. लष्कराचे हेलिकॉप्टर आपल्याला घ्यायला येतच असेल.’’

‘‘३.४ रिश्टर स्केलचा भुकंप? पण आम्ही सर्वजण इथे सुखरुप आहोत.’’

‘‘नक्कीच ही आमच्यासाठी दिलासा देण्यासारखी गोष्ट आहे, पण आम्ही आपल्याबाबत कोणताही धोका पत्करु शकत नाही.’’ आणखी वाचा

महिला आणि अंधश्रद्दा?

महिलांना त्यांच्या शरीरावरील कान नाक गळा पाय हातातील आभूषणे हे अंद्धश्रद्धे च्या गुलामगिरीच्या बेड़या वाटत नाही यामागे नक्कीच हजारो वर्षापुर्वी चा मानसिक पगडा असावा त्याच प्रमाणे पूर्वी स्वातंत्र्य लढाईत तरुण लोक आनंदाने फासावर जात कारण त्याना तो फास हा फास न वाटता स्वातंत्र्य देवी ने आपल्या साठी जनु फुलाचा हार विनला आहे असे वाटे आणि तो फास ते गळ्यात आनंदाने घालत.
याचप्रमाणे महिला ना अंधश्रद्देबेडया या बेड्या न वाटता ते अभुषणच आहे आणि त्या अंगावर मिरवतात त्या वेळी महिलांच्या अंधश्रद्धेच्या क्षेत्रातील लढाई बिकट बनते गुलामाला गुलामगिरी ची जाणीव करुण दिल्या शिवाय तो पेटुन् उठनार नाय. पण आपण गुलाम नाही अशीच त्यांची धारणा असते तेव्हा तर ती लढ़ाई अवघड होते पण या लढाई विरुध्द सातत्याने लढावे लागणार च नविन पद्धतीने अनेक वर्ष. शेवटी सत्याचा विजय होतो सत्य हे आपल्या बाजुला आहे म्हणून आपलाच विजय होणार.
By.. विवेकभाई पूनावाला

वटसावित्री !!!

वडाचे झाड तसे पुजनीयच आहे म्हणा ,त्याची पूजा केलीच पाहिजे, कारण ते २४ तास प्राणवायू ऑक्सिजन देते. परंतु सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून सुशिक्षित स्त्रिया जेव्हा त्याला दोरा गुंडाळून पूजा करतात तेव्हा मात्र त्यांच्या भाबडेपणाची व साक्षरतेची कीव करावीशी वाटते !
सत्यवान आणि सावित्री उन्हातून रस्त्याने जात असतांना प्रखर उन्हामुळे त्याला मूर्च्छा आली आणि तो बेशुद्ध होवून खाली कोसळला, सावित्रीने त्याला ओढत-ओढत बाजूच्या वडाच्या झाडाच्या सावलीत आणले. सावलीमुळे त्या सत्यवानाच्या शरीराचे तापमान सामान्य होऊन व त्याला मुबलक प्रमाणत प्राणवायू ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि सावित्रीने यमाला याचना करून आपला पती परत मिळविला म्हणून आजही अगदी सुशिक्षित स्त्रिया सुद्धा सात जन्मी हाच पती मिळावा ह्याच हेतूने वटसावित्रीला वडाच्या झाडाचे पूजन करतात.
मग त्या सावित्रीचे काय ?
जिने तुम्हाला शिकवून साक्षर करण्यासाठी शेण,माती, चिखल, दगड, शिव्या यांचा मार सहन केला? तो याच तुमच्या भोळ्या भाबड्या अंधश्रद्धा जोपासण्यासाठी का ? त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत बसण्यापेक्षा प्रत्येकीने दरवर्षी एक नवीन वडाचे झाड जर लावण्याचा कार्यक्रम केला असता तर किती बरे झाले असते नाही का?
सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून, मग तो कसाही असो व्यभिचारी असो, की दारुडा असो, रोज दारू पिवून तुम्हाला मरेस्तोवर मारणारा असो तुमच्या आईवडीलासह शिव्या देणारा असो, माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावणारा असो हुंड्यासाठी तुम्हाला छळणारा असो जाळणारा असो कसा ही असो पण सात जन्मी हाच पती लाभो म्हणजेच त्याचे अन्याय अत्त्याचार सोसण्यास एक जन्म अपुरा आहे म्हणून सात जन्मी हाच पती मिळावा का? आणि वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजा करून कधी सात जन्मी तोच पती मिळतो का? कुणाला आजवर
मिळाला आहे का? कुणाला आपला पुनर्जन्म आठवतो का?

चंदनभाऊ बुटे

अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात.

अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं,
'कुठून आणता ही सीताफळं? तुमचे मळे आहेत का?'

'कुठले मळे साहेब? आम्ही गरीब माणसं. लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात. झाडं उगवलीत दरीत. सारं फुकटच. आम्ही फळं गोळा करतो. पिकवतो आणि तुम्हाला विकतो. शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची.'

त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते. पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी!

बारमाही काम करता येईल असा हा देश.
बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती.
बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो.

वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते.
ही दृष्टी किती लोकांची असते? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल.

अग्निपुत्र : भाग ५

Dr.Marco & Imran working inside of Cave
जॉर्डन आणि डॉ.एरिक यांच्या अथक परिश्रमानंतर देखील ती महामानवी कवटी तेथून बाहेर निघत नव्हती.

"इथे ऊर्जा वाया घालवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आणखी माणसांची मदत घ्यावी लागेल." जॉर्डन मातीने माखलेले हात झटकत म्हणतात, "मिडियाला फोन करून बोलवूया." असं म्हणत तो मिडीयाला फोन लावतो. अँजेलिना त्यांना मध्येच अडवते.

"काय झाल? फोन लावतोय मी." जॉर्डन विचारतात.

"सर, इतक्यात मिडियाला बोलावणं योग्य नाही. आता तर आपण सुरुवात केली आहे. माहित नाही पुढे काय वाढून ठेवलं असेल. एका ठराविक निष्कर्षावर पोहोचल्याशिवाय आपण या गोष्टी उघड करु शकत नाही." अँजेलिना म्हणते.

"आपल्याला प्राचीन लिपी मिळाली आहे, मानवी वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. हेच काय तर प्रचंड मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली आहे. अजून कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं आहे?" जॉर्डन जरा खेसकतच तिला विचारतो.

"सॉरी सर, पण आपण गुप्त मोहिमेवर आहोत. बाहेर जर या मोहिमेबद्दल समजलं तर..."

अँजेलिनाला मध्येच अडवत जॉर्डन म्हणतो, "बाहेर जर या मोहिमेबद्दल समजलं तर एक नविन शोध लावला म्हणून आपलं नाव होईल. गेली ३५ वर्षे मी या क्षणाची वाट पाहतोय, ही संधी मी सोडणार नाही. आणि कुठली गोष्ट कधी आणि कुणाला सांगायची हे मी ठरवेन."

जॉर्डनच्या डोळ्यात लोभ दिसत होता. कुणाचही काही न ऐकता तो मिडियाला फोन लावतो. जॉर्डनची ही सवय सगळ्यांना माहीत असते. तो सगळ्यांपेक्षा जास्त अनुभवी असल्याने देखील कुणी काही बोलत नाही. जोर्डनचं संपूर्ण आयुष्य मानवी पूर्वजांच्या शोधात गेलं होतं. त्याने युरोप, कॅनेडा, आफ्रिका आणि उत्तर आशिया खंडात अनेक शोध लावले होते. पुरातत्त्व विभागात त्याचं मोठं नाव होतं आणि म्हणूनच भारत सरकारने ही जबाबदारी जोर्डनवर सोपवली होती.

गुहेमध्ये अंधार असल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने सगळे तिथून बाहेर निघतात. अँजेलिनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं. ती कसल्यातरी विचारात असते. डॉ एरिक अँजेलिनाला काही विचारणार इतक्यात जॉर्डन आतमधून धावतच बाहेर येतो. डॉ.अभिजीत त्याला काय झालं म्हणून विचारतो तेव्हा दिर्घ श्वास घेत जॉर्डन म्हणतो, आणखी वाचा

माणसाला अदृश्य करण्याचा प्रयोग यशस्वी

माणसाला अदृश्य करण्यात वैज्ञानिकांनी यश मिळवले असून प्रत्यक्षात एखादी वस्तू अदृश्य करणे म्हणजे प्रकाशीय आभासाचा खेळ असतो. जेव्हा एखादी वस्तू आपल्याला दिसते तेव्हा तिच्यावर पडलेले प्रकाशकिरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतात व त्यामुळे आपल्याला ती वस्तू दिसत असते. माणसाला किंवा एखाद्या वस्तूला अदृश्य करताना त्या वस्तूवर पडणारे प्रकाशकिरण हे तिला वळसा घालून जातात त्यामुळे ती आपल्याला दिसत नाहीत. या तंत्राचा वापर शत्रूला जहाजे दिसू नयेत यासाठीही करता येतो. माणूस अदृश्य होऊ लागला तर त्याचे काय परिणाम होतील याच्या कल्पनाच केलेल्या बऱ्या, पण तूर्त वैज्ञानिकांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे.
स्वीडनमधील कॅरोलिन्स्का संस्थेतील मेंदूवैज्ञानिकांनी हा प्रयोग केला. त्यात सव्वाशेजण सहभागी झाले होते, त्यांच्या तोंडावर एक डिस्प्ले लावला होता व नंतर त्या व्यक्तींना खाली त्यांच्या शरीराकडे पाहण्यास सांगितले असता त्यांना त्यांचे शरीर न दिसता मोकळे अवकाश दिसले याचा अर्थ त्यांचेच शरीर त्यांना दिसत नव्हते. तो अर्थात प्रकाशीय आभास होता. एच. जी. वेल्स या विज्ञान कादंबरीकाराने 'द इनव्हिजिबल मॅन' या कादंबरीत एक माणूस कसा अदृश्य होतो व नंतर वेडय़ासारखा बेफाम वेगाने गाडी चालवत सुटतो याचे वर्णन केले आहे.
आपलेच शरीर अदृश्य करण्याचा हा प्रयोग वैज्ञानिकांनी सहभागी व्यक्तींवर मोठय़ा पेंटब्रशचा वापर करून यशस्वी केला आहे, एका मिनिटात अनेक सहभागी व्यक्तींना त्यांनी अदृश्य करून दाखवले, त्यांना फक्त पेंटब्रश दिसत होता पण शरीर दिसत नव्हते असे आरविद गुटेरस्टॅम यांचे म्हणणे आहे.
त्यांनी सांगितले की, यापूर्वीच्या अभ्यासात आम्ही अशाच प्रकारे एक हात अदृश्य केला होता. आताच्या अभ्यासात त्याच पद्धतीचा विस्तार करून १२५ व्यक्तींचे शरीर अदृश्य केले. या व्यक्तींना चाकू खुपसण्याचा आभासही दाखवण्यात आला तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला पण तो आभास नाहीसा होताच ते पूर्ववत झाले. थोडक्यात त्या व्यक्तींना अवकाशात चाकू खुपसण्याची कृती पाहूनही घाम फुटला त्याअर्थी मेंदूने खरोखर चाकू खुपसला जातो आहे असा अर्थ लावला.
या व्यक्तींना अदृश्य अवस्थेत अनोळखी व्यक्तींसमोर उभे केला असता त्यांच्यावरील परिणाम तपासण्यात आला असता अदृश्य अवस्थेत त्यांचे हृदयाचे ठोके कमी झालेले निरीक्षणात दिसून आले. तसेच त्यांच्यावरील मानसिक ताणही वाढलेला होता असे गुटेरस्टॅम यांनी सांगितले. सामाजिक नैराश्याची जी लक्षणे असतात त्यावर उपचारांसाठी पुढे याचा उपयोग होऊ शकेल. त्याचा पुढे वैद्यकीय संशोधनात फायदा होईल, जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास
एच. जी. वेल्स या विज्ञान कादंबरीकाराने द इनव्हिजिबल मॅन या कादंबरीत अदृश्यतेची कल्पना मांडली होती.
स्वीडनमधील कॅरोलिन्स्का संस्थेतील प्रयोग.
* वस्तूवर पडलेले  प्रकाशकिरण परावर्तित न होता वस्तूला वळसा घालून जातात.
* जहाजे अदृश्य करण्यासाठी तंत्राचा वापर.
* १२५ व्यक्तींवर प्रयोग यशस्वी.
* सामाजिक नैराश्य व भीतीच्या भावनेचा अभ्यास करण्यात मदत.

मलेरियावरील लस ऑक्टोबरमध्ये उपलब्ध

मलेरियावरील जगातील पहिली लस ऑक्टोबपर्यंत विक्रीस उपलब्ध होणार आहे, आतापर्यंत या लसीच्या अनेक चाचण्या आफ्रिकेत घेण्यात आल्या असून लाखो रुग्णांमध्ये मलेरियाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी या लसीचा उपयोग होणार आहे.
संशोधकांनी सांगितले की, पहिल्याच मात्रेत ही लस ५ ते १७ महिन्यांच्या एकतृतीयांश बालकांमध्ये यशस्वी ठरली आहे, जगात १९.८ कोटी बालकांना मलेरिया होतो व त्यातील अनेक दगावतात त्यामुळे या लसीची आवश्यकता होती.
डासांमुळे होणाऱ्या या रोगाने दर वर्षी सहा लाख लोक मरण पावतात त्यात जास्त संख्या पाच वर्षांखालील मुलांची असते. आरटीएस, एस/एएसओ १ ही लस इंग्लंडच्या ग्लॅक्सोस्मिथक्लाईन (जीएसके) कंपनीने बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने दिलेल्या निधीतून तयार केली आहे व ती जगातील आजची सर्वात प्रभावी लस आहे. या लसीच्या चाचण्या २००९ मध्ये सुरू झाल्या व १५,५४९ मुलांना व बालकांना सहारन आफ्रिकेत ही लस देण्यात आली. बुर्किना फासो, गॅबॉन, घाना, केनिया, मलावी, मोझांबिक व टांझानिया या देशांचा या भागात समावेश होतो. लॅन्सेट मेडिकल जर्नलने याबाबत निष्कर्ष प्रसिद्ध केले असून एक हजार मुलांना ही लस चार वर्षांत देण्यात आली, त्यातील सरासरी १३६३ मुलांमध्ये मलेरिया रोखला गेला, ज्या मुलांना आणखी मात्रा देण्यात आली त्यांच्यात मलेरियापासून वाचण्याचे प्रमाण सरासरी १७७४ होते. जीएसके या कंपनीने आधीच या लसीची निर्मिती करण्याची परवानगी मागितली असून युरोपीय औषध संस्थेने या लसीला मंजुरी दिल्यास जागतिक आरोग्य संघटना या लसीचा समावेश आफ्रिकेतील लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये या लसीचा वापर सुरू केला जाईल. या लसीची चाचणी सहा ते १२ आठवडय़ांची मुले व पाच ते १७ महिन्यांची मुले अशा दोन गटांत घेण्यात आली. त्यांना सुरुवातीला तिमाही लस देण्यात आली व नंतर १८ महिन्यांनी देण्यास आली. अगदी लहान बालकांमध्ये या लसीचा परिणाम कमी दिसला पण तीन वर्षांच्या मुलांपर्यंत रोगाचा धोका २६ टक्के कमी झाला. अगदी गंभीर स्वरूपाचा मलेरिया झालेल्यांमध्ये ही लस प्रभावी ठरलेली नाही. जरा जास्त वयाच्या लोकांमध्ये गंभीर स्वरूपाच्या मलेरियात ही लस व बूस्टर डोस यामुळे रोगापासून ३२ टक्के संरक्षण मिळाले आहे, लंडन स्कूल ऑफ हायजिनचे प्राध्यापक ब्रायन ग्रीनवूड यांनी सांगितले की, या लसीचे खरोखर फायदे आहेत.
आजाराचे बळी
*२०१३ मलेरियामुळे मृतांची संख्या ५,८४,०००
*सर्वात जास्त ९० टक्के  मृत्यू आफ्रिकेत
*मरण पावलेली पाच वर्षांखालील मुले - ७८ टक्के
*आफ्रिकेत दर वर्षी मरणाऱ्यांची संख्या ४३००००

अग्निपुत्र : भाग ४

४,००० वर्षांनंतर :
पृथ्वीची रचना आणि सजीवांची संरचना यांत अभूतपूर्व बदल घडले होते. एकविसावे शतक सुरु झाले होते. मनुष्य प्राण्याने पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले होते. यंत्र आणि यंत्रमानवांचा शोध लागलेला असतो. रस्ते, इमारती, पायाभूत सुविधा विकसित झालेल्या असतात. मनुष्य प्राणी विमानाच्या सहाय्याने आकाशात उडू शकत होता, जहाजाच्या सहाय्याने पाण्यात, पाणबूडीच्या सहाय्याने पाण्याच्या आत तर अवकाशयानाच्या सहाय्याने पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाऊ शकला. मात्र ज्या ठिकाणी रुद्रस्वामी आणि अग्निपुत्र जमिनीखाली गाडले गेले त्या सुप्त ज्वालामुखीपर्यंत तो पोहोचू शकला नाही, त्याला त्या सुप्त ज्वालामुखीमागील शांतता देखील माहित नव्हती.

मानवाच्या शरीराप्रमाणे मेंदू चांगल्या प्रकारे विकसित झाला होता. वैज्ञानिकांनी अनेक स्तरांवर क्रांती घडवून आणली होती. जन्म मृत्यूच्या प्रमाणात मानवी वैचारिक क्रांतीचा मोठा भरना होता. त्यांच्या रचना आणि संरचनांचे आविष्कार संपुर्ण जगाला ठाऊक होतो.

अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर भू-उत्खनन करणारे आणि भुगर्भशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या जॉर्डन आपल्या समुहासह हिमालय येथे उत्खननाचे कार्य सुरु करतात. त्यांच्या समुहामध्ये प्राचीन भाषांची अभ्यासिका अॅंजेलिना, भु-उत्खननमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवलेले डॉ.मार्को आणि डॉ.एरिक, भु-मापन शास्त्रज्ञ इम्रान आणि भारतीय वंशाचे भुगर्भशास्त्राचे उच्च पदवीधर डॉ.अभिजीत त्यांना हिमालयाच्या जवळपास मिळालेल्या काही अमानवी शारीरिक सांगड्याांच्या तपासासाठी तेथे आलेले असतात. सांगड्याांबरोबर मिळालेले प्राचीन काळातील काही चित्रविचित्र नमुन्यांचा तपास करण्यासाठी जॉर्डनला त्याच्या समुहासह गुप्त मोहिमेवर पाठविले असते. आणखी वाचा

कधीतरी कुणीतरी शेणाचे आणि दगडाचे वार सहन केले आहेत हे विसरू नका

स्त्यावरुन जर कोणी मुली जात असल्या तर मी त्यांना नेहमी सांगतो... अर्थात ओळखीच्या असतील तर,...... कि मुलीँनो आज जरी तुम्हि मुक्त पणे फिरत असाल, काँलेजला जात असाल पण या साठी कधीतरी कुणी शेणाचे आणि दगडाचे वार सहन केले आहेत हे विसरु नका.
- पु.लं.देशपांडे.
संदर्भ - पुलं यांनी school of indian music चे संचालक देवधर यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणातिल अंश आहे.

चेहऱ्यावरून वय ओळखणाऱ्या 'हाऊ ओल्ड.नेट'चा धुमाकूळ

सध्या सोशल मिडीयावर मायक्रोसॉफ्टच्या 'हाऊ ओल्ड. नेट'चा प्रचंड बोलबाला सुरू आहे. त्यामुळे फेसबुकवर तुम्हाला सध्या मोठ्या प्रमाणावर तुमच्या मित्र-मैत्रिणींची छायाचित्रे आणि त्या छायाचित्रांनूसारचे आश्चर्यकारक निकाल पहायला मिळतील. तुम्ही स्वत:चे छायाचित्र अपलोड केल्यानंतर 'हाऊ ओल्ड.नेट' हे वेब अॅप्लिकेशन छायाचित्र पाहून तुमचे वय किती असेल याचा अंदाज लावते. या अॅप्लिकेशनमुळे येणारे निकाल तितकेसे अचूक नसले तरी नेटकरांना सध्या विरंगुळ्याचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. चेहऱ्यावरून लावण्यात येणाऱ्या वयाच्या अंदाजामुळे सोशल कट्ट्यावर सध्या हास्यविनोदाला चांगलाच बहर आला आहे.

फुलझाडांचा टांगता बगीचा!

घरात किंवा गच्चीमध्ये बाग फुलवण्याची अनेकांना हौस असते. यामध्ये काय वेगळं करता येईल याचाही प्रयत्न केला जातो. तुमच्या बागेला वेगळेपण आणि सौंदर्य देण्यात शिंकाळी अर्थात हँगिंग बास्केट नक्कीच उपयोगी पडतील. 

फुलझाडांची टांगती शिंकाळी (हँगिंग बास्केट) म्हणजे बागेतील खास गोष्ट. ही शिंकाळी दिसतात सुंदरच; शिवाय त्यांचा प्रभावही खूप पडतो. वास्तू लहान असो वा मोठी, फुलझाडांच्या शिंकाळ्यांनी ती सुशोभित होते. अगदी लहान जागेत अडकवलेलं एखादं शिंकाळंही त्या जागेचं सौंदर्य वाढवतं. त्यामुळे वातावरणात सजीवता निर्माण होते आणि मनही प्रसन्न होतं. 

यांचा वापर कुठंही होऊ शकतो. घरगुती बागा, फ्लॅटच्या घराच्या बाल्कनीतील सज्जे, टेरेसे अशा ठिकाणी, बंगला असल्यास बंगल्याच्या पुढील भागातील पोर्चमध्ये, मागील भागात भिंती, कमानींवर त्याचप्रमाणे खिडकी, दारं, चौकट, पडवी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही शिंकाळी अडकवता येतात. वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जवळपास अंतरावर अडकवलेली ही शिंकाळी स्वतःचीच एक बाग निर्माण करतात. तुमच्याकडे बागेसाठी जागा नसेल, तर छोटी बाल्कनी, सज्जा, टेरेसमध्ये या फुलझाडांच्या शिंकाळ्यांची छोटीशी बाग तयार करता येईल. 

पुरेसं अन्न, पाणी, पाण्याचा योग्य निचरा, हलक्या हातानं केलेली खुरपणी, स्टेरॅमिलसारख्या खतांचा अल्पप्रमाणातील वापर अशा प्रकारे या शिंकाळ्यांची निगराणी केली जाते. फुलझाडांसाठी वापरण्यात येणारी शिंकाळी त्रिकोणी किंवा गोलाकार आकाराची असून, त्या सर्वसाधारणपणे ८ ते २४ इंच लांबी-रूंदीच्या असतात. शिंकाळ्याची उंची कमी असल्यानं छोट्या-वनस्पती किंवा सीझनल फुलझाडांची लागवड त्यामध्ये केली जाते; कारण या वनस्पतींची मुळं खोलवर जमिनीत जात नसल्यानं त्यांना ती जागा पुरते. वनस्पतींना आर्द्रता आणि आधार मिळण्यासाठी मॉसचा वापर केला जातो. नारळ्याच्या झावळ्या आणि त्यांचा मऊ भाग यांचाही यासाठी उपयोग होतो. तारेच्या जाळ्या, प्लास्टिक, वायर, जाड वेताच्या मटेरियलनं या टोपल्या किंवा शिंकाळी बनवली जातात. या छोट्या कुंड्यांना खाली ३-४ भोकं पाडून पाण्याचा निचरा केला जातो. 

खत, माती घालून तयार केलेल्या या शिंकाळ्यात एकाच प्रकारचं फुलझाड किंवा २-३ वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावू शकतो. ज्या वनस्पतींना भरपूर फुलोरा येतो किंवा ज्या वाढून सर्वत्र पसरू शकतात अशा वनस्पतींचा वापर आवर्जून करावा. एकाच शिंकाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावून रंगसंगती निर्माण केली जाते, तेव्हा मधोमध उंच, सरळ वाढणाऱ्या वनस्पती आणि शिंकाळ्याची बाजूनं किंवा कडेनं पसरून, वाढून खाली लोंबकळणारी फुलझाडं लावावीत. ठराविक उंचीपर्यंत वाढल्यानंतर फुलझाडांची टोकं छाटून आणि बाजूनं कडेनं वाढलेल्या वनस्पतींची छाटणी करून शिंकाळी मेंटेन करावीत. त्यामुळे एकसूत्रता निर्माण होईल. 

हँगिंग बास्केटनं घर सजवण्यासाठी टिप्स... 

रंगसंगतीः सर्वांत प्रथम दृष्टीस पडतात, ते फुलझाडांचे रंग आणि रंगसंगती. त्यामध्ये विरुद्ध रंगाचे उदा. पिवळा-जांभळा किंवा नारंगी-निळा असं काँबिनेशन तयार करून प्रमाणबद्ध योजनेचा दृश्य परिणाम साध्य होईल. लाल, पिवळा, निळा रंग हे परिणाम साधतातच; शिवाय विरुद्ध चंदेरी-पांढरा यांचं गडद जांभळ्या किंवा निळ्या रंगात काँबिनेशन केल्यास उठून दिसतं. शिंकाळ्यात वनस्पती लावताना अशाप्रकारे रंगसंगतीचा विचार करावा. 

शिंकाळ्यांची योजना फार महत्त्वाची ठरते, ती वनस्पतीच्या फॉलिएजमुळे. फॉलिएजमुळे वनस्पतींना स्थिरता येऊन आकर्षक परिणाम साधला जातो. 

प्रमाणबद्धताः गर्दी किंवा दाटी न होता एकाच किंवा २-३ वनस्पतींचे एकत्रित वाढून भरगच्च फुलणं शिंकाळ्यास उठाव आणतं. 

हँगिंग बास्केट दृष्टीच्या सर्व बाजूनं अपील होईल अशाप्रकारे तयार करून त्याची मांडणी करावी. तुमच्या नजरेच्या टप्प्यात येण्याच्या उंचीवर बास्केटची मांडणी करावी. उंच वाढणाऱ्या सरळ वनस्पती आधारासाठी आणि खाली वाढणाऱ्या वनस्पती समतोल साधणाऱ्या असतात.
उर्मिला अत्रे 

अग्निपुत्र : भाग ३

आपल्या सर्व अनुयायांना जगभरातील विविध ठिकाणी पाठविल्यावर रुद्रस्वामी पूर्वेच्या दिशेने जातात. प्रचंड अंतर पादांक्रांत केल्यानंतर रुद्रस्वामी आपल्या विश्वसु अनुयायी आणि काही विद्वानांसह  समुद्रमार्गे पूर्वेला पोहोचतात. ​बोटीतून किनाऱ्यावर उतरताच त्यांना तिथले लोकजीवन दिसते. अर्ध-भटकी जीवनशैली, शिकार करून जगणे, पाण्यावरील लाकडीघरे व अविकसित शेती ही तिथली जीवनपद्धत त्यांना स्पष्टपणे दिसत होती. बारीक डोळे असलेले आणि चेहऱ्यावर सतत आनंद असलेले मनुष्य पाहून सोबत असेलेले सार्वजन आनंदी झाले.

"स्वामी, आता आपल्याला काय करावयाचे आहे?" एक अनुयायी प्रश्न विचारतो.

स्वामी वर आकाशाकडे बघतात, पक्षी मोठमोठे थवे करून समुद्राहुन जमिनीच्या दिशेने उड़त होते. स्वामींना नैसर्गिक आपत्तीची कल्पना आधीपासूनच होती. ते आपल्या बरोबर असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करतात. सर्वजण एका उंच ठिकाणी जातात आणि काही क्षणातच त्या भागाला त्सुनामिची मोठी धड़क बसते. अनेक पशु, वनस्पती आणि मनुष्य आणि त्यांची घरे वाहून जातात. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. सर्व अनुयायी हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघत असतात. थोड्या वेळापूर्वी आनंदाने आपली कामे करणारे आता मृतावस्थेत पडलेले होते.

"स्वामी, हे काय आहे? निसर्गाचं इतकं रौद्र रूप आम्ही कधी पाहिलं नव्हतं. आपल्याला याची कल्पना होती का?" एक विद्वान विचारतात.

"होय, आम्हाला या आपत्तीची पूर्ण कल्पना होती." रुद्रस्वामी त्याच्याकडे न बघतच उत्तर देतात.

"स्वामी, मग आपण त्या निष्पाप मनुष्यांना का नाही वाचवले? आपण त्या सर्वांना वाचवू शकला असता."

"आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण म्हणजे मृत्यूचे माहेरच आहे.इथे पावलापावलावर तुम्हाला मृत्यू दिसेल. इथल्या मनुष्यांना मृत्यूची सवय आहे. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, हिंस्त्र पशुचा हल्ला अशी अनेक कारणे आहेत की जरी ह्या प्रदेशावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडत तरी सर्वात हिंस्त्र भूमी फक्त हीच आहे." स्वामी खाली बघतात तेव्हा त्यांना सर्व शांत झालेले दिसते. ते पुढे म्हणतात, "आता प्रत्येकाने कमीत कमी दोन व्यक्तींचे शव आपल्याबरोबर घेऊन चला. मला १०० मृत माणसे हवी आहेत."

विद्वानाला स्वामींच्या मनातील समजते. ते सर्व वाटेने मिळतील तितके शव घेऊन ज्वालामुखी पर्वताच्या दिशेने निघतात. आणखी वाचा

फेसबुक प्लस अॅप

जगभरातील विविध साइट्वर, अॅप्सवर तुमच्याविषयी खूप सारी माहिती उपलब्ध आहे, तुम्ही दिलेली नसताना! जगभरातील विविध वेबसाइट, ई-मेल, अॅप, सोशल नेटवर्किंग साइट्वर तुम्ही दिलेल्या माहितीवरून ही माहिती गोळा केली जाते. मात्र, यापुढे फेसबुक तुम्हाला तुमच्या माहितीवर अधिक कंट्रोल देणार आहे. इतरांबरोबर तुम्हाला फेसबुकवरील कोणता माहिती कोणाशी शेअर करायची आहे, हे तुम्ही स्वतः ठरवू शकणार आहात.

फेसबुक लॉगिनचे नवीन व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यात तुम्हाला तुमची कोणती माहिती इतरांसोबत शेअर करायची आहे, हे निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. त्यात उपलब्ध पर्याय निवडून एखादी माहिती शेअर करण्याची परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय फेसबुस युजरला असेल. नव्या लॉगिनमध्ये विविध अॅप फेसबुक युजरच्या नावे कशाप्रकारे माहिती पोस्ट करतात, हे देखील खुले केले जाणार आहे. फेसबुक लॉगिनचा उपयोग करून युजरचा अनावश्यक डाटा गोळा करणाऱ्या अॅपवर देखील फेसबुक निर्बंध आणणार आहे. सध्या पिइंटरनेस्ट आणि नेटफ्लिक्ससाठी फेसबुकने हे बदल केले असून येत्या काही आठवड्यात इतर सर्व अॅपवर देखील अशाप्रकारचे निर्बंध आणले जातील. यासह फेसबुकने एक स्वतंत्र टीम तयार केली असून युजरच्या पब्लिक प्रोफाइलपेक्षा अधिक माहिती, ई-मेल अॅड्रेस व फ्रेंडलिस्ट मागणाऱ्या अॅप्सची पडताळणी याद्वारे केली जाणार आहे.

फेसबुकने त्यांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थर्ड पार्टी डेव्हलपर त्याचे अॅप वापरणाऱ्या युजरच्या फ्रेंड्सची माहिती अॅक्सेस करण्याची परवानगी मागू शकेल. मात्र त्यांचे वाढदिवस, फोटो वगैरे माहितीचा त्याला अॅक्सेस मिळणार नाही. यासर्व गोष्टींमुळे फेसबुक युजरला स्वतःची प्रायव्हसी अधिकाधिक जपता येणार आहे.

फेसबुकच्या युजरला लवकरच विविध वृत्तपत्रे, मासिके यातील आर्टिकल, व्हिडीओ थेट पाहता येतील, अशी शक्यता आहे. सध्या न्यूयॉर्क टाइम्स, बझफीड, नॅशनल जिओग्राफिक सोबत कंपनीची बोलणी सुरू असून यातील आर्टिकल वगैरे थेट फेसबुक युजरला उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

आजचा तरूण हे असलेच काही काही पाहत वाढला.

धर्मातीत राज्यातल्या आकाशवाणीवर सकाळच्या वेळी ’देवा तुझ्याशिवाय आम्हाला आधार नाही’ ह्या अर्थाचे टाहो ऎकत आला. त्याच्य ऎन उमेदीच्या वर्षात भाषावार प्रांतरचनेचे वाद त्याने पाहिले. भाषिक द्वेषाची परिसीमा पाहिली. ज्या समाजाला शिक्षणाची दारे बंद होती, त्या समाजातून नवा सुशिक्षित वर्ग जन्माला आला. त्याने आपल्या पददलित समजाचे अंतरंग उघडे करून दाखवायला सूरुवात केली. त्यातुन क्षोभाचे दर्शन घडू लागले. ....

हल्लीच्या पिढीला आदराची भावना नाही हे म्हणतांना ज्याच्याविषयी आदर बाळगावा अशी उभ्या देशातील किती माणसे त्यांना दाखवता येतील ?
आमच्या विज्ञानविभागाचे प्रमूख सत्यसाईबाबांच्या मागून जाताना दिसतात आणि माणसाचे भविष्य माणसनेच घडवायचे आहे हे सांगण्या-या समाजवादी तत्वज्ञानाचा घोष करणारे पुढारी मंत्रिपद मिळावे म्हणून गणपतिबाप्पाला साकडे घालतात.....
एका बाजूला ३५ - ३५ मजल्यांच्या हवेल्या उठत असलेल्या तो पाहातो त्याबरोबर झोपडपट्ट्या वाढतांना त्याला दिसतात. लोकनेत्यांचे उच्चार आणि आचार यात त्याला ताळमेळ दिसत नाही. मग त्याचा संताप उफाळून येतो. तो नविन कवीच्या कवितांमधुन कधी निराशेचा, कधी वैतागाचा सूर घेवून बाहेर पडतो तर कधी विध्वंसाची भाषा करीत येतो.
तरूण मनाच्या ह्या अस्वस्थतेने वडीलपिढी अस्वस्थ न होत, त्यांना बेजबाबदारपणाणे नावे ठेवतांना आढळते. प्रत्येक काळात पिढ्यांतली दरी असते. पण गेल्या काही वर्षात ती अधिकच भयान होवू लागली आहे. हल्लीच्या पिढीला मुल्यांची कदरच नाही हे म्हणणे कोडगेपणाचे आहे. चांगली मूल्ये जतन करण्यासाठी आयुष्याचा होम केलेली माणसेच त्यांना दिसली नाहीत.
- - ' खिल्ली ' मधून साभार

अग्निपुत्र : भाग 2

रुद्रस्वामींचा चेहरा जरा चिंतित होतो.
‘‘म्हणजे? आम्ही समजलो नाही. आमच्यापासून तुम्हाला कोणता धोका आहे? माझ्या माहितीप्रमाणे युध्दसंहाराव्यतिरिक्त आमच्या हस्ते तुमच्यापैकी कुणाचाही वध झालेला नाही. आणि राहिला प्रश्न नामशेष होण्याचा, आमच्या मनात तसा विचार देखील आलेला नव्हता.’’
‘‘आम्ही आपल्या विधानाशी पुर्णतः सहमत आहोत. आपण आमच्या संहाराचा विचार देखील मनात आणला नव्हता. मात्र या सृष्टीचा हा नियमच आहे, तुम्हाला तुमचा कूळ वाचवायचा असेल तर ज्याच्यापासून तुम्हाला धोका आहे त्याचा समूळ नाश करा.’’ सुर्वज्ञ दिर्घ श्वास घेतात. रुद्रस्वामी आपल्या अनुयायांना त्यांचे बांधलेले हात सोडायला सांगतात. अनुयायी सुर्वज्ञचे हात सोडतात. एक अनुयायी त्यांच्यासाठी जल घेऊन येतो. रुद्रस्वामी आपल्या विश्वासू अनुयायांबरोबर त्यांच्यासमोर बसलेले असतात. जलप्राशन केल्यानंतर सुर्वज्ञ पुढे बोलू लागतात.
‘‘आपण ज्या भुतलावर आहात त्याला पृथ्वी असे म्हणतात. ही पृथ्वी गेल्या 350 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. आधी हा फक्त एक गोळा होता ज्यावर कोणताही जीव नव्हता. पृथ्वीवरील वातावरण अगदी अस्थिर होतं. ऋतू सतत बदलत असायचे. अशातच पृथ्वीवर पाणी निर्माण झालं आणि त्या अनुशंगाने पृथ्वीवर जीवांची निर्मिती सुरु झाली. आधी किटकरुपात असलेले हे जीव कालांतराने पाण्यात पोहू लागले. त्यांचा शारीरिक विकास चांगला झाला तेव्हा पोहणाऱ्या जीवांनी त्या किटकांचा नाश केला. त्यानंतर जलचरांमध्ये वेगवेगळ्याा हवामानानुसार आणि स्थानानुसार आणखी बदल होऊ लागले. काही जलचर पाण्यातच राहू लागले तर काही जमिनीवर आले. त्याच वेळी काही जलचर सरपटू लागले. सरपटणारे जीव आमचे पूर्वज होते. जसजसे शारीरिक बदल होऊ लागले तसतसे आकाशात उडणारे जीव सुध्दा या पृथ्वीवर दिसू लागले. या सर्व कालावधीमध्ये खुप मोठा काळ लोटला गेला. अनेक जाती निर्माण झाल्या आणि लगेच नष्ट झाल्या तर अनेक जातींनी शेवटपर्यंत तग धरला. सर्वांमध्ये इतके बदल होत होते की पृथ्वीवर शेकडो जाती अस्तित्वात आल्या. आल्या आणि आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांना संपवू लागल्या. ज्या वाचल्या त्यांनी आपल्या वंशजांना अधिक विकसित करण्याचं कार्य सुरु ठेवलं. आमचे पुर्वज मात्र या सर्वांपासून खुप दूर उत्तरेकडे (आत्ताचे युरोप) होते. मात्र आमच्यापैकी काही जाती मागे राहिल्या असतील असं त्यांना सतत वाटत होतं. तरीही आमच्या पुर्वजांनी बाहेरच्या जगाशी संपर्क पुर्णतः बंद केला आणि आमचे पुर्वज एका वेगळ्याा विश्वात विकसित होत गेले.’’ आणखी वाचा

स्त्रियांना मिळाला जगण्याचा अधिकार!

आपल्याकडे पूर्वी महिलांना विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच, परंतु जगण्याचाही अधिकार ख-या अर्थाने नव्हता. प्रजासत्ताकाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्यातील योग्यतेनुसार ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा मान मिळवून दिला. विधवांनाही समाजात कोणतेही अधिकार आणि स्थान नव्हतं. परंतु आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनं कोणताही भेदाभेद न मानता, इंदिरा गांधींना पंतप्रधानपद दिलं. याद्वारे जगण्याविषयीचा विस्तृत दृष्टिकोनच घटनेनं आपल्या सर्वाना दिला. काहींना प्रजासत्ताकाचा अर्थही कळत नाही, उलट त्याचा गैरवापर होताना दिसतो. मग अण्णाभाऊ साठेंनी जे म्हटलं होतं, ‘ये आजादी झुठी हैं, देश की सत्ता भुखी हैं!’ ही परिस्थिती आजही तशीच आहे. दारूचे दुष्परिणाम, प्रेमप्रकरणांमधून समोर येणारी हिंसक वृत्ती, तरुणांमधली निष्क्रियता अशा समाजविघातक गोष्टींनी अंत:करण दुखावतं. म्हणून देशभर काही प्रासंगिक विषयांवरही सप्त खंजिरी वादन, गाणी या माध्यमातून माझं प्रबोधन सुरू असतं. क्रिकेटच्या विरोधात मी प्रबोधनाची मोहीमच सुरू केली आहे. क्रिकेटचे सामने भरवण्यापेक्षा, खरी गरज ही वर्षानुर्वष अर्धवट राहिलेले प्रश्न, समस्या, नसलेल्या सेवासुविधा पूर्ण करण्याची, असं मला वाटतं. कायदा कडकच आहे, त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करून घेणारे नालायक आहेत. कायदा आहे म्हणून आसाराम बापू, तरुण तेजपाल आज न्यायालयीन कोठडीत आहेत. धर्माचा किंवा कुठल्याही प्रकारचा धाक आज न उरल्यामुळे बळावत चाललेल्या वाईट वृत्तीतून ही कृत्य घडतात. म्हणूनच घरच्यांचा, मोठ्यांचा धाक हा हवाच!
- सत्यपाल महाराज (सप्तखंजिरी वादक)

'मायक्रोसॉफ्ट एज' घेणार 'इंटरनेट एक्सप्लोरर'ची जागा

मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे 'मायक्रोसॉफ्ट एज' या नव्या वेब ब्राऊझरचे अनावरण करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या 'विंडोज-१०' या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये 'इंटरनेट एक्सप्लोरर' या वेब ब्राऊसरची जागा आता 'मायक्रोसॉफ्ट एज' घेणार आहे. 
सुरूवातीला 'स्पार्टन' या नावाने तयार करण्यात आलेला हा नवीन वेब ब्राऊसर आता 'एज' या नावाने ओळखला जाईल. मायक्रोसॉफ्टच्या एका कार्यक्रमात यासंबंधीची घोषणा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना या ब्राऊझरच्या काही खास वैशिष्ट्यांची झलकही पहायला मिळाली. 'मायक्रोसॉफ्ट एज' या ब्राऊझरची रचना आजच्या पिढीला समोर ठेवून करण्यात आली आहे. यामध्ये वापरकर्त्याला त्याच्या सवयीनुसार बातम्या, शेअर बाजाराचे निर्देशांक, हवामान आणि अन्य गोष्टींची माहिती शोधता येणार आहे. 
या ब्राऊझरच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल नेमकी माहिती कळू शकली नसली तरी, 'विंडोज-१० या नव्या ऑपरेटिंग प्रणालीला केंद्रस्थानी ठेवून 'मायक्रोसॉफ्ट एज' ब्राऊझर बनविण्यात आला आहे. या ब्राऊझरच्या सहाय्याने वापरकर्त्याला आता सोशल साईटसवर असताना थेटपणे एखाद्या वेबपेजवर जाता येणार आहे. त्यामुळे माहिती वाचण्यातील अडथळे कमी होणार आहेत. 'मायक्रोसॉफ्ट एज' हा ब्राऊझर डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब्लेट आणि मोबाइल अशा सर्व प्रकारच्या उपकरणांवर वापरता येईल.


हसत खेळत व्यायाम

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यंदा मुलांना वेगवेगळ्या शिबीरात अडकवण्याऐवजी व्यायामाची सवय लावली तर? 

वाढ‌त्या वयांच्या मुलांसाठी शरीराची किमान हालचाल गरजेची असते. अगदी लहान वयापासूनच हलक्या फुलक्या व्यायामाची सवय मुलांना लावली तर त्यांच्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरतं. अगदी ३ वर्षांपासूनच तुम्ही मुलांना थोड्याथोड्या व्यायामाची सवय लावू शकता. व्यायाम केल्यामुळे मुलं दमतात त्यांना भूक लागते. त्यांच्या पोटात कोणत्याही सबबींशिवाय अन्न जातं आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांची वाढ चांगली होते. आरोग्य उत्तम राहतं. 

मुलांचे व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन करायचे अवजड किंवा अवघड व्यायाम नव्हेत. त्यांच्यासाठी व्यायाम म्हणजे थोडीशी हालचाल. मुलांना घरात बसवून ठेवण्यापेक्षा मोकळ्या मैदानात खेळायला घेऊन जा. धावणं, उड्या मारणं, फुटबॉल किंवा चेंडूने खेळायला लावणं अशा गोष्टी तुम्ही त्यांना करायला लावू शकता. मुलांच्या शाळेतल्या विविध क्रीडामहोत्सवांसाठी प्रोत्साहन द्या. मुलं खेळासाठी करणा‍ऱ्या प्रयत्नांना दादही द्या. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांवर व्यायामाची जबरदस्ती नको. त्यांना व्यायामाचा तिटकारा येईल, असं काहीही करू नका. किंवा मोठ्यांसाठी जसं व्यायामाचं काटेकोर वेळापत्रका आखलं जातं तसं मुलांसाठी ठेऊ नका. उलट त्यांचा व्यायाम अधिक आनंददायी करण्याचा प्रयत्न करा. सोपी योगासनं, जिम्नॅस्टिक्सचं मुलांना प्रशिक्षण द्या. फुटबॉल, क्रिकेटसारखे मैदानी खेळ खेळायला लावा. या सर्वांमुळे आपल्या शरीराचा तोल कसा राखावा, खेळताना डोळे आणि हात-पायांचा योग्य समन्वय कसा राखावा, या गोष्टी मुलं आपोआप शिकतील. मुलांचं टीव्ही पाहणं, त्यांचा अभ्यास, कॉम्प्युटर वा व्हिडीओ गेम्स या सा‍ऱ्या गोष्टींतून व्यायामालाही वेळ काढा. गृहपाठ, खेळ आणि व्यायाम याचं योग्य ते वेळापत्रक बनवा. 

व्यायामाचे फायदे 
हाडं आणि स्नायू बळकट होतात. 
शारीरिक क्षमता वाढते. 
आत्मविश्वास वाढतो. 
एकाग्रता साधता येते. 
ताण कमी होतो. 
झोप छान लागते. 
आजारांची शक्यता कमी होते. 
मुलांसाठी सोप्पे व्यायाम 
सायकल चालवणं 
कुत्र्याला फिरायला नेणं 
पतंग उडवणं 
पोहणं 
उड्या मारणं 
नाचणं 
मित्र-मैत्रिणींसोबत मैदानावर खेळणं.