टाटांनी घेतला 'अपमाना'चा बदला


काळ कधी, कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात. अशीच काहीशी घटना रतन टाटांसोबत १९९९ मध्ये घडली. बोलावणं आल्याने रतन टाटा आपल्या चमूसह त्यावेळी अमेरिकेत डेट्रॉइटला गेले होते. मात्र अतिशय वाईट पद्धतीने अपमान झाल्याने त्यांना तिथून परतावे लागले. नंतर २००८ मध्ये म्हणजे नऊ वर्षींनी टाटांनी आपल्या अपमानाचा बदला घेतलाच.

हॅचबॅक इंडिका नावाने टाटा समूहाने १९९८ मध्ये आपली पहिली कार बाजारात आणली. पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीने हा कार उद्योग फोर्ड मोटर्सला विकण्याची तयारी सुरु केली. टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये येऊन फोर्डच्या अधिकाऱ्यांनीही खरेदीत रुची दाखवली. आणि त्यानंतर डीलसाठी टाटा समूहाला अमेरिकेत डेट्रॉइटमध्ये बोलवण्यात आलं. त्यावेळी रतन टाटा आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांसह १९९९ मध्ये डेट्रॉइटला गेले. 'तुम्हाला काही माहितीच नव्हती तर कार उद्योगात उतरलेच कशाला? तुमचा हा उद्योग आम्ही खरेदी करतोय याबद्दल तुम्ही आमचे उपकारच मानायला हवेत', असं त्या बैठकीत फोर्डकडून सुनावलं गेलं. त्या बैठकीत सहभागी असलेले टाटा समूहातील प्रमुख अधिकारी प्रवीण कडले हा सर्व घटनाक्रम सांगत होते. या अपमानामुळे टाटा मोटर्सच्या टीमने संध्याकाळी लगेचच मायदेशी रवाना होण्याचा निर्णय घेतला. परतीच्या प्रवासात रतन टाटा खूपच उदास दिसून आले, असं कडलेंनी सांगितलं.


१९९९ मध्ये झालेल्या अपमानाचा बदला अखेर नऊ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये टाटा समूहाने फोर्डला चुकता केला. प्रमुख ब्रॅण्ड असलेल्या जॅग्वार आणि लँड रोवरला खरेदी करत टाटा समूहाने फोर्डला सनसणीत चपराक दिली. 'जेएलआर' खरेदीकरुन टाटा समूहाने फोर्डवर खूप मोठे उपकार केले, असं 'जेएलआर' डीलनंतर फोर्डचे अध्यक्ष बिल बोर्ड यांना बोलावं लागलं. अशी माहिती कडलेंनी दिली. टाटा समूहाने २००८ मध्ये २.३ अब्ज डॉलरमध्ये 'जेएलआर'ला खरेदी केलं होतं. जागतिक पातळीवर 'जेएलआर' आता टाटांच्या नावाने धावतेय.

लग्न आणि आपण

कुत्रा घ्यावा कि न घ्यावा ह्या निर्णयाप्रत येण्यासाठी खूप विचार करावा लागतो. म्हणजे दोन्ही बाजू पारखून आपल्यासाठी कुठली चांगली आहे हे नेमके कळावे लागते. कुत्रा पाळण्याचे अनेक फायदे आहेत, उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना कुत्रे सोबत देतात, चोर पासून संरक्षण करतात पण दुसरी बाजू बघायला गेल्यास कुत्र्यांची निगा राखावी लागते, त्यांना वेळोवेळी बाहेर घेवून जावे लागते, त्यांची शी शू साफ करावी लागते इत्यादी.
लग्न हा सुद्धा तसाच एक निर्णय असतो. लग्न करावे कि करू नये, ह्या प्रश्नाचे उत्तर बहुतेक वेळा करावे असेच असते. पण लग्नाचा स्पष्ट फायदा कुणीच सांगत नाही. एकटेपणाची भीती हा एक महत्वाचा मुद्दा असतो पण बहुतेक विवाहित, मी लग्न न केले असते तर चांगले झाले असते असे आयुष्यभर म्हणत असतात. काही जन मोक्याच्या वेळी धाडस दाखवतात आणि लोक त्यांना समर्थ म्हणू लागतात. काही जणांना नंतर पश्चात्ताप होतो व ते बुद्ध होतात. पण न्यानेश्वाराच्या वडिलां प्रमाणे काही जन संन्यास घेवून नंतर लग्न करतात व समाजाची अवहेलना सोसतात. समाज सुद्धा मजेदार असतो, पलायन केल्याची स्तुती व परत येणार्यास बडगा.
लग्नाचा फायदा हा भौतिक नसून केवळ ऐक आशा असते. आशा हीच कि कुठल्याही क्षणी कोणी तरी आपल्या सोबत असेल. मी पडलो तर चट्ट करून हाथ देयील, सकाळी चहा करून देयील , आंघोळीचे पाणी गरम करून देयील ह्या सगळ्या आशा पुरुषाला ओढत नेवून लग्नाच्या बेडीत बंदिस्त करतात.
लग्न होते. लग्न झाल्या झाल्या गौतम बुद्ध घर सोडून का गेला असावा ह्या प्रश्नाचे उत्तर उमजायला लागते. सोमवार ते शुक्रवार काम करून आपण शनिवारी सकाळ पर्यंत मस्त पैकी झोप काढावी हे सत्य भूतकाळातील ऐक सुखद घटना बनते. त्या nostalgia मध्ये रमत “शनिवारी उठल्या नंतर समोर गरम गरम चहा असावा” हि आशा ऐक स्वप्न बनून जाते. प्रत्यक्षात आपण कडक इस्त्रीचे कपडे (इस्त्री आपल्यालाच करावी लागते) घालून, हातात भेटवस्तू (आपल्या खिशाला चाट पडून घेतलेली) व चेहऱ्यावर कृत्रिम हसू घेवून , हिच्या मामाच्या मुलीच्या छोट्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला ऐक प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलेलो असतो.
तिकडे पलीकडे हिचीच कोणी तरी दूरची, जिला आपण मराठीत कझिन (cousin) म्हणतो ती आपल्या केसाची लाट सावरीत असते. अनिल कुंबळेच्या हातून कॅच सुटल्यावर तो जसा बॉल कडे बघतो तश्या नजरेने आपण तिच्या कडे बघत असतो. ती सोडून इतराकडे आपली हि ओळख करून देते. ह्यांना ओळखला का? हा प्रश्नाने सुरुवात होवून anthropology चा research paper वाटावा अश्या आशयाने शेवटी ती ओळख समाप्त होते. Cousin, uncle ह्या vague शब्दा साठी आपण मनोमन विन्ग्रजीचे आभार मानतो.
चाणाक्ष लोक “आपण ओळखला का ह्यांना?” हा प्रश्नावर , जर ती व्यक्ती प्रौढ असली तर चट्ट करून “हे ते तुझे Uncle ना ? आमच्या लग्नात तर आले होते. ” व जरा तरुण असली तर uncle चे रुपांतर cousin मध्ये करून वेळ मारून नेतात. हा शनिवारी नाही तरी पुढल्या शनिवारी तरी नक्की आपण झोप काढायचीच असे मनावर ठसवीत बसतात.
शनिवारी संध्याकाळी आपले एका काळाचे मित्र फोन करतात. अरे काल ना आपण Bristros मध्ये गेलो होतो. काल तिकडे couple entry नव्हती ना म्हणून, आपल्या दुखावर मीठ चोळतात. पूर्वी आपण की की बघायचो आता अगदी मल्लिका शेरवत चा picture बघायला guilty feel होवू लागते.
हळू हळू आपण हार मनात जातो. “संसारात रमणे” हे त्याला दिलेले गोंडस नाव असते. आपली क्रिकेटची बँट, जिला आपण एव्हडे जपत आलेलो असतो ती हरवते, कविता सुचत नाहीत , कामात बदल रुचत नाही. जिला आपण सडपातळ म्हणून पसंत केलेले असते तिचे वाढलेले वजन आता जाणवत नाही कारण आपले पोट सुद्धा सुटत चाललेले असते.
आता आपण स्वतः हून सकाळी उठून अंघोळ करतो, स्वतः चहा करून पितो. Getz साठी जमवलेला आपला बँक balance De bears Diamon necklace साठी गेला तरी आपण स्तिथप्रग्य असतो.
मागे वळून बघण्यात कधी nostalgia तर कधी खंत वाटू लागते. जुनी मैत्रीण , जिच्या बरोबर आपण भेल पुरी खायचो ती कधी तरी मॉल मध्ये दिसते पण आपण “अजून सुद्धा तशीच दिसतेय” असे मनात म्हणत नजर चुकवून जातो, कारण हिची नजर आपल्यावरच असते. काही कोलेज कुमारी हसत खिदळत जातात, आपण तिकडे बघत नाही. आपण उगाच मोबयील शी चाळा करत बसतो. चित्रपट गृहात Dark Knight, Angels and Demons ऐवजी प्रियादर्शन चा ऐक विनोदी चित्रपट बघून आपण चक्क हसतो.
कधीतरी आपण आईला भेटायला जातो. नक्की की बोलावे हा प्रश्न पडतो. तिला ५ हजाराचा चेक देवून यावे असे वाटते, तिला काही तरी सोने द्यावे असे वाटते. धाडस होत नाही. आई म्हणते जेवून जा , होय म्हणावेसे वाटते पण आपण काही तरी सबब सांगून निसटतो.
आपण दुखी असतो का? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे आपल्याला जमत नाही. टी वी बघत असताना हि आत भाजी करपवत असते. आपल्यात जो बदल घडून आला त्याच्या साठी तिच्यावर रागवावे, तिला ओरडून सांगावेसे वाटते. तेवढ्यात तिने आपल्या सगळ्या वाढदिवसाला न विसरता आवर्जून दिलेली ग्रीटिंग कार्ड्स मनासमोर तरळून जातात. जरा ताप की आला तिने डॉक्टरला phone केलेला आठवतो. ऑफिस चा राग मी तिच्यावर काढलेला तिने निमूट सहन केलेला असतो. कधीतरी टी आपल्याला बिलगून हसमसून रडलेली आपल्याला आठवते , कारण आठवत नाही पण तिच्यावर रागवावे असे मुळीच वाटत नाही.

स्मार्टफोनलाही यूएसबी सी पोर्ट

सी पद्धतीचे यूएसबी पोर्ट असलेले क्रोमबुक पिक्सल २०१५ गुगलने नुकतेच लाँच केले. यूएसबी पोर्टमधील सी पद्धतीचे पोर्ट हेच भविष्यात महत्त्वाचे ठरणार हे यावेळी स्पष्ट झाले. या नवीन पोर्टला सपोर्ट करणारे क्रोमबुक आणि नवीन अॅपल मॅकबुक ही डिव्हाइसेस याआधीच बाजारात आली आहेत. सी पोर्टला सपोर्ट करणाऱ्या क्रोमबुक पिक्सलनंतर आता यी सी पोर्टला सपोर्ट करणाऱ्या अँड्रॉइड फोनची निर्मिती करण्याचा गुगलचा विचार आहे. भविष्यात हे सी पोर्ट सध्याच्या मायक्रो यूएसबी पोर्टची जागा घेईल. 

यूएसबी टाइप सी कनेक्टरमध्ये यूएसबी ३.१च्या तोडीचा डाटा ट्रान्स्फर स्पीड मिळेल. शिवाय, यात रि‌व्हर्सिबल प्लगही असेल. त्यामुळे योग्यरित्या पोर्टमध्ये प्लग लावण्यास लागणाऱ्या वेळेतही बचत होईल. 

नवीन क्रोमबुक पिक्सलमधील यूएसबी टाइप सी कशा पद्धतीने कार्य करते, हे दर्शवणारा एक व्हिडीओ गुगलच्या अॅडम रॉड्रिग्ज यांनी प्रसिद्ध केला आहे. येत्या काळात अँड्रॉइड आणि क्रोमबुकमध्ये यूएसबी टाइप सी हे फीचर पाहायला मिळेल, असे त्यांनी यात स्पष्ट केले आहे. 

अॅपलचा नवीन मॅकबुकसुद्धा अशाच यूएसबी पोर्टचा उपयोग करणार आहे. क्रोमबुक पिक्सलबरोबर हे पोर्ट देण्यात येत आहे. यूएसबी टाइप सी पोर्ट लवकरच सर्व स्मार्ट फोनसाठी सामायिक कनेक्टर म्हणून वापरता येईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत बहुतांश स्मार्ट फोन्स यूएसबी पोर्ट सी असलेले येतील, अशी अपेक्षा आहे. 

ऑक्टोपस चे रक्त निळे का असते ?

ऑक्टोपसला तीन हृदय असतात. Hemocyanin नावाच्या रंग्द्रव्यामुळे ऑक्टोपसच्या रक्ताला नीला रंग येतो.
Hemocyanin हे रक्तातील प्रथिने असून त्यात कॉपर / तांबेचे अणु असतात जे तितक्याच संख्येचे ऑक्सिजनचे अणु पकडून ठेवतात. Hemocyanin मुळेच अत्यंत प्रतिकूल तापमानात सुद्धा जीव जिवंत राहू शकतात. पाठीचा काना नसलेल्या जीवांमध्ये Hemocyanin आढळते.
निळ्या रंगाच्या या Hemocyanin मुळेच ऑक्सिजन ओक्टोपसच्या शरीरात पुरवला जातो. ऑक्टोपसला तीन हृदय असतात आणि पाठीचा कणा नसलेल्या इतर सजीवापेक्षा त्याला सर्वात जास्त ऑक्सिजन लागतो आणि Hemocyanin ते पुरवण्याचे कार्य करतो.
ऑक्टोपस चे रक्त तांब या धातूवर असल्याने निळे तर मानवाचे लोह धातूवर आधारित असल्याने लाल असते.

Cancer उपचारा दरम्यान केस का गळतात ?

Cancer उपचारासाठी वापरण्यात येणारे केमोथेरपीचे औषध हे खूप पावरफुल असतात, केंसरच्या वेगाने वाढणाऱ्या पेशींवर ते जोरात हल्ला चढवतात. परंतु हे औषध cancer शिवाय शरीरातील वेगाने वाढणाऱ्या इतरही पेशींवर हल्ला करतात उदा. केसांच्या पेशी.
केमोथेरपीमुळे फक्त डोक्यावरीलच नाही तर शरीरावरील सर्वच केस निघून जाऊ शकतात अगदी भुवया, पापण्या सुद्धा. सुद्दैवाने केसांचे हे गळणे तात्पुरते असते. थेरपी संपली कि 3-६ महिन्यानंतर केस येयला पुन्हा सुरुवात होते.

मांजरीं उडी मारल्यावर पायावरच कशा पडतात ?

काही मोजक्या प्राण्याप्रमाणे मांजरींच्या हाडांचा सांगाडा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असतो. मांजरींना खांद्याचे हाड नसते. आणि पाठीचे हाडे सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा जास्त लवचिक असतात त्यामुळे खाली पडत असताना ते जास्त गतीने स्वताला गोल फिरउ शकतात आणि हवी तशी हालचाल करू शकतात.
परंतु दोन किवा जास्त मजल्यावरून उडी मारली तर मांजरींना सुद्धा दुखापत होऊ शकते. कारण मांजरींचे पाय तो धक्का सहन करू शकत नाही. 

आजची स्त्री : पारंपारिक की खरी आधुनिक?

मुलींसाठी पहीली शाळा काढल्यावर पुण्यातील सनातनी लोकांनी "धर्म बुडाला" अशी आवई उठवली... धर्मग्रंथानूसार स्ञियांना शिक्षणास बंदी होती, ते धर्मग्रंथ झुगारून साविञीमाईंनी मुलींना शिकवले.. आज मुली अंतराळात गेल्या, तरी धर्म बुडाला का?? पण ज्या धर्मग्रंथामूळे स्ञीयांनां वाचण्यास, लिहण्यास अधिकार नव्हता... आता स्ञिया शिकून, लिहून तेच धर्मग्रंथ, पोथ्यापुराणे वाचत आहेत या सारखे दुर्देव दूसरे नाही.. अगदी प्राध्यापक झालेल्या स्ञीया सुद्धा आज़ सत्संग क्रेंद्र, आश्रमात जात आहेत, साविञीच्या लेकीची ही अवस्था पाहून साविञीमाईंचा जीव पण तिळ तिळ तूटत असेल.. आज त्या मातेच्या असीम त्याग आणि प्रयत्नांची साविञीच्या लेकींना जाणीव असायला हवी !!

...तर व्हॉट्सअॅपवरून हद्दपार

कॅलिफोर्नियाः हो, हे शक्य आहे. व्हॉट्सअॅप किंवा व्हॉट्सअॅपच्या सुविधा तुम्ही थर्डपार्टी अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस करणार असाल, तर तुम्हाला अशापद्धतीने व्हॉट्सअॅप कदाचित कधीच वापरता येणार नाही. पण तुम्ही व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप पुन्हा वापरायला सुरुवात कराल तरच तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरता येईल, अन्यथा नाही.

सध्या WhatsApp+, WhatsApp Reborn, OgWhatsapp यासारख्या काही अॅप्सच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपचा वापर करता येतो. मात्र ही काही अधिकृत अॅप्स नाहीत. या अॅपचा वापर करणाऱ्या युजरला काही मेसेज मिळतच नाहीत किंवा याद्वारे जाहिराती पसरविल्या जातात किंवा अन्य मार्गाने युजरच्या डेटाचा गैरवापर होतो, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जे युजर या अॅपवरून व्हॉट्सअॅप वापरत असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना व्हॉट्सअॅपवरून हद्दपार करण्याची कारवाई कंपनीने सुरू केली आहे. जोपर्यंत हे युजर व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप वगळता इतर अॅप वापरत राहतील, त्यांना व्हॉट्सअॅपच्या सुविधा मिळणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या युजरला व्हॉट्सअॅपच्या सुविधा हव्या असतील, तर त्यांना व्हॉट्सअॅपच्या अधिकृत अॅपचा वापर पुन्हा सुरू करावा लागेल.

कॉलिंगच्या माध्यमातून व्हायरस

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने कॉलिंगची सुविधा सुरू केली आहे. अर्थात ठराविक युजरनाच सध्या ती वापरता येते. मात्र व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहता, इतर युजरनाही त्याचा वापर करायची इच्छा आहे. या युजरना गंडविण्यासाठी whatsappcalling.com आणि यासारख्या या वेबसाइटचे नाव असलेला मेसेज युजरपर्यंत पाठविला जात आहे. ही वेबसाइट ओपन करा आणि व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरू करा, अशाप्रकारचा संदेश यासोबत पाठविण्यात येतो. व्हॉट्सअॅप कॉलिंग मोफत असल्याने व मेसेजमधील वेबसाइटचे नाव व्हॉट्सअॅपशी साधर्म्य दाखविणारे असल्याने अनेक युजर याला बळी पडत आहेत. या मेसेजमधील वेबसाइटच्या नावावर क्लिक केल्यास अनेक व्हायरस मोबाइलमध्ये आपोआप डाऊनलोड होत आहेत. त्यामुळे युझरची अनेक प्रकारची गोपनीय माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता अधिकृतरित्या व्हॉट्सअॅप कॉलिंगची सुविधा मिळेपर्यंत वाट पाहणेच योग्य.
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स