फक्त आणि फक्त मेहनत

Posted by Abhishek Thamke on १:१२ म.उ. with No comments
बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी आज दोन मोठ्या राष्ट्रांचे नेतृत्व करत आहेत. डॉ.अब्दुल कलाम यांनी अंतराळ आणि क्षेपणास्त्र क्षेत्रात जी प्रगती केली ती वाखाणण्याजोगी आहे. आज जगातील प्रत्येक व्यक्ती यांपैकी कुणाला ना कुणाला आदर्श मानत आहेत. मात्र, अनेकांना या महापुरुषांचे अगोदरचे आयुष्य कदाचित माहित नसेल. ओबामा यांनी कशा परिस्थितीमध्ये संघर्ष केला, मोदींचा 'चहावाला ते पंतप्रधान' हा प्रवास कसा झाला, डॉ.अब्दुल कलाम यांनी कोणत्या परिस्थितीला तोंड देत क्रांती घडवून आणली या गोष्टींचा विचार करायला हवा. मी मुद्दाम इथे काहीही सविस्तर सांगत नाहीये. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग, कार्ल मार्क्स, शिवाजी महाराज, मदर तेरेसा, नेल्सन मंडेला अशा थोर व्याक्तीमात्वांचे विचार आपण वाचत असतोच, तसे ते प्रेरणादायी आहेतच. एकदा या महापुरुषांचा देखील संघर्ष आवश्य वाचा. तेव्हा आपल्याला समजेल, आपण कुठे आणि किती कमी पडतोय.
- अभिषेक ठमके
Reactions: