एक मजेदार गोष्ट...

Posted by Abhishek Thamke on १०:४७ म.पू. with No comments
एक दिवस एक कूत्र जंगलात रस्ता चुकून भटकतो.
तेव्हा त्याने बघितल की एक वाघ त्याच्याकडेच येतो आहे. कुत्र्याची जाम टरकलि.

"आज तर मी कामातुन गेला!"
तेव्हा त्याच लक्ष त्याच्यासमोर पडलेल्या सुकलेल्या हाड पडलेले होते.
तो लगेच त्याच्याकडे येणार्यावाघाकडे पाठ करुन बसला.
आणि एक सुखलेल्या हाडाला चोखायला लागला आणि जोरजोरात बोलू लागला,
"वाह! वाघाला खाण्याची मजा काही वेगळीच आहे.
अजुन एक भेटला तर पुर्ण मेजवानीच होईल!".
आणि त्याने एक जोरदार ढेकर दिला...
.
आता वाघाची चांगलि टरकली तो विचारात पडला, त्याने विचार केला
"हा कूत्रा तर वाघाची शिकार करतो ! जीव वाचवून पळा!"

झाडावर बसलेला एक माकड हा सर्व तमाशा बघत होता.
त्याने विचार केला की ही चांगलि संधि आहे वाघाल सर्व सांगतो यामुळे वाघाशी मैत्रीपण होईल आणि जीवनभर संकट राहणार नाही!
.
तो पटापट वाघाच्या मागे पळाला.
कुत्र्याने माकडाला वाघाच्यामागे जाताना पाहील !
.
तिकडे माकडाने वाघाला सर्व सांगितल कि कूत्र्याने कस त्याला मुर्ख बनवल.
वाघ जोरात ओरडला,
"चल माझ्यासोबत त्या कुत्र्याची
आज त्याला ठारच मारतो",
आणि त्या माकडाला पाठीवर बसवून त्या कूत्र्याकडे जायलालागला. ! !
.
.
(आता तुम्ही विचार करा कुत्र्यानेकाय केल असेल...)
.
त्या कुत्र्याने वाघाला परत येतांना बघितल आणि परत त्याच्याकडे पाठ करुन बसला आणि जोरजोरात बोलायला लागला
"या माकडाला पाठवून एक तास झाला साला एक पणपण वाघ फसवून नाही आणला...''
Reactions: