आमच्याबद्दल


Abhishek Thamke
Founder - Abhishek Thamke
नमस्कार,

इंटरनेट वर अनेक भाषांमध्ये वेगवेगळी Applications उपलब्ध झाली आहेत. Applications च्या माध्यमातून एक प्रकारे भाषिक प्रगती होत आहे. काही Applications फक्त फ्रेंच, जर्मन, जपानी, चीनी भाषेतच उपलब्ध आहेत. हे फक्त Applications च्या बाबतीतच नाही, तर विविध स्तरांवर इतर भाषिकांनी आपल्या भाषेचाच वापर करून प्रगती केली आहे. इतर भाषांप्रमाणे मराठीतून देखील Applications उपलब्ध व्हावीत यासाठी काही संस्थांनी मराठी Applications सुरु केली आहेत. मात्र काही युवक असेही असतात ज्यांना आर्थिक अडचण आणि मार्गदर्शनाअभावी आपले Applications इंटरनेट वर सादर करता येत नाही.

'अर्थ मराठी' या नावाने एक अशी संस्था सुरु होत आहे, जिथे मोफत मराठी ई-पुस्तक प्रकाशित केले जाईल, गुगल प्ले स्टोर वर मराठी Application जोडले जाईल. तसेच शहरापासून ते खेड्या-पाड्यातील उमद्या तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जाईल.

नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. दिवाळी अंक हे नाव ऐकूनच आपल्याला समजतं की नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन वाचावयास मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी शेकडो दिवाळी अंक निघत असतात. मात्र एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे जागतिकीकरणामुळे अनेक महाराष्ट्रीयन आणि मराठी नागरिक इतर देशात स्थायिक झाले आहेत. त्यांना देखील दिवाळी अंकाबाबत तितकीच उत्सुकता असते जितकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला. म्हणून 'अर्थ मराठी' इंटरनेट च्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेल्या नागरिकांना दिवाळी अंकाचा आस्वाद घेण्याची संधी देत आहे.

सदर दिवाळी अंकासाठीचा वाचकवर्ग हा जागतिक स्तरावरील असल्याने त्यामध्ये जगातील विविध देशातून मराठी लेखक, कवी यांनी आपले लेख पाठवले आहेत. इंटरनेटवरील अनेक मान्यवर तसेच उमदे लेखक यांचे लेख आपल्याला 'अर्थ मराठी दिवाळी अंक २०१३' मध्ये एकत्र पाहता येणार असून ब्राझील येथील जागरूक महिला पत्रकार बेथ्रिज एम.बी. यांनी या दिवाळी अंकासाठी प्रस्तावना दिली आहे.

अर्थ मराठी प्रमुख,
अभिषेक ठमके
abhishek.thamke@gmail.com

संलग्न संस्था :
प्रबोधन समुह
मराठी ब्लॉग विश्व
Google Play Sotre
Google+
Facebook
Achruti Applicaions
Smashwords
Scribd.com
Netbhet.com

सादर केलेल्या कलाकृती :
१.  मैत्र जीवांचे - ई-पुस्तक
२.  मैत्र जीवांचे - गुगल प्ले Android Application
३.  प्रबोधन - ई-पुस्तक
४.  अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१३
५.  एक सुंदर कविता - ई-पुस्तक
६.  लढ (कुसुमाग्रज) - ई-पुस्तक
७.  महाराष्ट्रातील संत - ई-पुस्तक
८.  महाराष्ट्रातील संत - गुगल प्ले Android Application
९.  ओलांडून जाताना - ई-पुस्तक
१०.ओलांडून जाताना - गुगल प्ले Android Application