ई-दिवाळी अंक

सदर संकल्पनेच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर  दिवाळी अंकाचा आस्वाद घेऊ शकता. आपणांस सांगावयास अतिशय आनंद होत आहे की दिवाळी अंकासाठी महाराष्ट्राप्रमाणे ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि अमेरिका येथून देखील मोठ्या प्रमाणात लेख येत असतात.

नोव्हेंबर महिना म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. दिवाळी अंक हे नाव ऐकून आपल्याला अंदाज येतो की नक्कीच काहीतरी नवीन वाचावयास मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी शेकडो दिवाळी अंक निघत असतात. मात्र एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे जागतिकीकरणामुळे अनेक महाराष्ट्रीयन आणि मराठी नागरिक इतर देशात स्थायिक झाले आहेत. त्यांना देखील दिवाळी अंकाबाबत तितकीच उत्सुकता असते जितकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला, आणि म्हणूनच 'अर्थमराठी' इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेल्या नागरिकांना दिवाळी अंकाचा आस्वाद घेण्याची संधी देत आहे.

सदर दिवाळी अंकासाठीचा वाचकवर्ग हा जागतिक स्तरावरील असल्याने त्यामध्ये जगातील विविध देशातून मराठी लेखक, कवी यांनी आपले लेख पाठवले आहेत. इंटरनेटवरील अनेक मान्यवर तसेच उमदे लेखक यांचे लेख इथे येत असतात, त्या सर्वांना संधी देण्याचे काम अर्थ मराठी ई-दिवाळी अंक करते. जगातील वेगवेगळ्या ठिकाणातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

आपल्याला दिवाळी अंकातील लेख नक्कीच आवडतील. लेख वाचून झाल्यावर आपले अभिप्राय abhishek.thamke@gmail.com वर नक्की कळवा तसेच प्रत्येक लेखासामावेत लेखक/ कवी यांचा ई-मेल दिलेला आहे. आपण त्यांनाही थेट संपर्क करू शकता.

दिवाळी अंकाबद्दल सांगत असताना आपल्याला 'अर्थमराठी' बद्दल थोडी माहिती देतो. भारतामध्ये आजही हे नाव जास्त परिचयाचे नाही. मात्र अमेरिका या देशात हे नाव त्यामानाने चांगलेच परिचयाचे आहे. अर्थ मराठी सुरु करण्याचे कारण असे की, इंटरनेटवर अनेक भाषांमध्ये वेगवेगळी Applications उपलब्ध झाली आहेत. Applications च्या माध्यमातून एक प्रकारे भाषिक प्रगती होत आहे. काही Applications फक्त फ्रेंच, जर्मन, जपानी, चीनी भाषेतच उपलब्धआहेत. हे फक्त Applications च्या बाबतीतच नाही, तर विविध स्तरांवर इतर भाषिकांनी आपल्या भाषेचाच वापर करून प्रगती केली आहे. इतर भाषांप्रमाणे मराठीतून देखील Applications उपलब्ध व्हावीत यासाठी काही संस्थांनी मराठी Applications सुरु केली आहेत. मात्र काही युवक असेही असतात ज्यांना आर्थिक अडचण आणि मार्गदर्शनाअभावी आपले Applications इंटरनेटवर सादर करता येत नाही.

'अर्थमराठी' या नावाने एक अशी संस्था सुरु होत आहे, जिथे मोफत मराठी ई-पुस्तक प्रकाशित केले जाईल, गुगल प्ले स्टोरवर मराठी Application जोडले जाईल.तसेच शहरापासून ते खेड्या-पाड्यातील उमद्या तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जाईल. खरे तर ही एक झेप नाही तर हे एक नवे पर्व आहे. जगातील वेगवेगळ्या ठिकाणातील मराठीतील विचारवंत/ लेखक/ पत्रकार/ जाणकार/ अभ्यासू व्यक्ती आपले अनमोल विचार ई-पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतील. याचा संपूर्ण लाभ हा आपल्याला आणि एकूणच आपल्या समाजाला होणार आहे तसेच येणाऱ्या पुढच्या पिढीला यासाठी आपला अभिमान असेल की आपण जगात होणाऱ्या बदलाचा एक भाग होऊन बदलात सहभागी होत आहोत. तर चला मग, अर्थ मराठीच्या माध्यमातून बदलाचा भाग बनूया...

आपलाच,
अभिषेक ठमके
(abhishek.thamke@gmail.com)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या