स्मार्टफोनलाही यूएसबी सी पोर्ट

सी पद्धतीचे यूएसबी पोर्ट असलेले क्रोमबुक पिक्सल २०१५ गुगलने नुकतेच लाँच केले. यूएसबी पोर्टमधील सी पद्धतीचे पोर्ट हेच भविष्यात महत्त्वाचे ठरणार हे यावेळी स्पष्ट झाले. या नवीन पोर्टला सपोर्ट करणारे क्रोमबुक आणि नवीन अॅपल मॅकबुक ही डिव्हाइसेस याआधीच बाजारात आली आहेत. सी पोर्टला सपोर्ट करणाऱ्या क्रोमबुक पिक्सलनंतर आता यी सी पोर्टला सपोर्ट करणाऱ्या अँड्रॉइड फोनची निर्मिती करण्याचा गुगलचा विचार आहे. भविष्यात हे सी पोर्ट सध्याच्या मायक्रो यूएसबी पोर्टची जागा घेईल. 

यूएसबी टाइप सी कनेक्टरमध्ये यूएसबी ३.१च्या तोडीचा डाटा ट्रान्स्फर स्पीड मिळेल. शिवाय, यात रि‌व्हर्सिबल प्लगही असेल. त्यामुळे योग्यरित्या पोर्टमध्ये प्लग लावण्यास लागणाऱ्या वेळेतही बचत होईल. 

नवीन क्रोमबुक पिक्सलमधील यूएसबी टाइप सी कशा पद्धतीने कार्य करते, हे दर्शवणारा एक व्हिडीओ गुगलच्या अॅडम रॉड्रिग्ज यांनी प्रसिद्ध केला आहे. येत्या काळात अँड्रॉइड आणि क्रोमबुकमध्ये यूएसबी टाइप सी हे फीचर पाहायला मिळेल, असे त्यांनी यात स्पष्ट केले आहे. 

अॅपलचा नवीन मॅकबुकसुद्धा अशाच यूएसबी पोर्टचा उपयोग करणार आहे. क्रोमबुक पिक्सलबरोबर हे पोर्ट देण्यात येत आहे. यूएसबी टाइप सी पोर्ट लवकरच सर्व स्मार्ट फोनसाठी सामायिक कनेक्टर म्हणून वापरता येईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत बहुतांश स्मार्ट फोन्स यूएसबी पोर्ट सी असलेले येतील, अशी अपेक्षा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या