प्रतिभेचे देणे

Posted by Abhishek Thamke on ११:३६ म.पू. with No comments
पु ल देशपांडे ह्यानी आपल्या एका प्रवासवर्णनात एका जपानी शहराचे वर्णन केले होते. त्यात पु ल नि म्हटले होते की "अश्याच एका निवांत संध्याकाळी, असेच दिवे बघताना रवींद्रनाथनी 'शुभं करोति कल्याणम्' लिहून टाकले पण आपल्यासारखे साधारण लोक मात्र आपल्याला तसल्या प्रतिभेचे देणे लाभले नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय आणखी काही करू शकत नाहीत."
पु ल सारख्या लेखकांची हालत अशी होत असेल तर आमच्या सारख्या फुटकळ लेखक मंडळीना काय वाटावे ?
प्रतिभेचे देणे म्हणजे काय असते हे समजायला जास्त त्रास घ्यायची गरज नाही. तो एक कवी, आपल्या छोट्याश्या खोलीत गगनाला गवसणी घालतोच पण त्या काही शब्दांत आमच्या सारख्याना आपण किती छोटे आहोत ह्याची जाणीव करून देतो. आम्ही सर्वानीच कधीतरी प्रेमकाव्य लिहिले आहे, पण पु ल सावरकरांच्या प्रेमकाव्या विषयी काय लिहितात ते पहा.
सावरकरांनी प्रेमकाव्य लिहिलं. पण त्या प्रेमाची उत्तुंगता काय!
शतजन्म शोधीताना शत आर्ति व्यर्थ झाल्याशतसूर्य मालिकांच्या दीपावली विझल्या.
केवढं विराट स्वरूप...कि तुझी माझी आत्ता या क्षणी गाठ पडतेय, त्याच्यापूर्वी काय झाल?
शतजन्म शोधत होतो, शत आर्ति व्यर्थ झाल्या आणि शतसूर्य मालिकांच्या
दीपावली विझल्या होत्या. येवढा काळ गेला होता... येवढं विराट जे कुणी पाहू
शकतो, त्याची प्रतिभा कुठल्या जातीची असेल...
गजल लिहिणारे कवी असंख्य आहेत पण खालील शब्दात आपली व्यथा व्यक्त करणार्या गजल लेखकाला देवी सरस्वतीचा तो आशीर्वाद लाभला आहे ह्यात शंकाच नाही.
मुझसे मिलने के वो करता था बहाने कितने,
अब गुजारेगा मेरे साथ ज़माने कितने,
मैं गिरा था तो बहुत लोग रुके थे लेकिन,
सोचता हूँ मुझे आए थे उठाने कितने,
जिस तरह मैंने तुझे अपना बना रखा है,
सोचते होंगे यही बात न जाने कितने,
तुम नया ज़ख्म लगाओ तुम्हे इससे क्या है,
भरने वाले है अभी ज़ख्म पुराने कितने, 
 http://goo.gl/m2tr2d
Reactions: