अच्छे दिन आने वाले है...

Posted by Abhishek Thamke on ४:१६ म.उ. with No comments
हा विजय आहे नरेंद्र मोदी या नावाचा... एका माणसाने बदलून टाकली जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सत्ता... खरंच, अच्छे दिन आने वाले है...गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर स्टेशनमद्धे रेल्वे गाड्यांमध्ये अन फलाटावर चहा विकणारा एक मुलगा राजेश खन्नाचा प्रचंड चाहता होता. तरुण वयात तो त्याच्यासारखेच कपडे घालून त्याच्यासारखी डायलॉगबाजी करायला शिकला. जी त्याच्या पुढील कारकिर्दीमद्धे त्याला खूप पुढे घेऊन गेली. चारचौघात तो धीटपणे बोलायला शिकला. बघता बघता तो सार्वजनिक ठिकाणी भाषण द्यायलाही शिकला, आणि मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही. देशाने शेकडो मुख्यमंत्री पाहिले पण विकासाचा धूमधडाका उडवणारा आणि तरीही भ्रष्टाचारापासून चार हात दूर असलेला असा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे नरेंद्र मोदीच असा नावलौकीक मिळवणारा हा नेता म्हणूनच आज देशातील करोडो तरुणांसाठी आशेचा एक मोठा किरण ठरलाय. 

पहिल्या इनिंगमद्धे जबरदस्त खेळी करणारे मनमोहन सिंग दुसऱ्या इनिंगमद्धे मात्र सपशेल फेल गेले, आणि देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला. देशावर आज तब्बल ४२६ बिलिअन डॉलर म्हणजे साडे पंचवीस लाख कोटींचे परदेशी कर्ज आहे. जे तुम्हा आम्हालाच फेडायचे आहे. गेल्या तीन-चार वर्षात विकास दर ९ टक्केवरून पाच टक्केच्याही खाली घसरलाय त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था गाळात रुतलीय. परदेशी गुंतवणूकदार देशात पैसे गुंतवायला तयार नाहीत. त्यामुळे आज लाखो तरुण रोजगाराअभावी घरी बसले आहेत.

परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी वित्त संस्था नरेंद्र मोदींच्या आगमनाकडे डोळे लावून बसले होते. गेल्या काही दिवसात शेअर बाजारामाद्धे त्यामुळे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक व्हायला सुरुवात झालीय. आता मोदी पंतप्रधान झाले तर सेन्सेक्स तीस हजाराचाही पल्ला गाठून बाजारात छप्परतोड तेजी यायची संभावना झालीय. त्यामुळे देशात प्रचंड परदेशी गुंतवणूक होईल, आणि लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विकास दर पुन्हा एकदा उसळी घेऊन सहा टक्केच्या वर जाईल. आणि तुमच्या आमच्या पगारात चांगली वाढ होऊन वर्षाला घसघशित बोनसही मिळेल. 

मोदी पंतप्रधान झाले तर रुपया जी मुसंडी मारेल ती केवळ अविश्वसनीय अशीच असेल. जसा तो चाळीस वरून सत्तर रुपयापर्यंत कोसळला तसाच तो पुन्हा एकदा ४०-४५ च्या दिशेने जोरदार मुसंडी मारायचा प्रयत्न करेल. त्यामुळे देशाला कोणता फायदा होईल ? पेट्रोल आणि डीझेलसाठी आपण दर वर्षी लाखो कोटी रुपयांचे परदेशी चलन देतो त्यात दोन पाच लाख कोटींची बचत होईल. त्यामुळे पेट्रोल डीझेलचे भाव कमी होतील. साहजिकच महागाईवर नियंत्रण आणणे सरकारला सहज शक्य होईल. राहिली गोष्ट भ्रष्टाचाराची. त्या बाबतीत तरी नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यामद्धे जमीन आसमानाचा फरक आहे. लाखो कोटींचे घोटाळे झाले तरी मुग गिळून बसणाऱ्या मनमोहन सिंगपेक्षा नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्वाच इतके प्रभावशाली आहे कि भ्रष्टाचार करणारा कुठलाही मंत्री दहा वेळा विचार करील. 


Reactions: