२०१४ चे उदारमतवादी भारतरत्न

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना गुणवत्ता, कर्तृत्व आणि राजकीय सोय यांची सांगड घालण्याची पूर्वापार परंपरा पाळत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदुत्ववादी शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय मदनमोहन मालवीय यांना हा सन्मान जाहीर केला आहे. हिंदुत्वाचा मवाळ सर्वसमावेशक चेहरा आणि 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' असे म्हणणारा आग्रही विचार, अशा दोन्ही प्रवाहांना एकाचवेळी खूष ठेवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित करून केंद्र सरकारने दीर्घकाळच्या जनभावनांचा आदर केला आहे. भारतीय राजकारणाचा इतिहास ज्यांच्या समावेशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे वाजपेयी यांचे नेतृत्व आहे. हिंदुत्ववादी संगोपन असूनही उदारमतवादाचा वारसा त्यांनी जपला. त्यांचे कार्य फक्त जनसंघ वा भारतीय जनता पक्ष यांच्यापुरते कधीच सीमित नव्हते. वाजपेयी नेहमीच पक्ष आणि विचारसरणीच्या भेदांपलीकडे वाटचाल करीत राहिले. आघाडीचे सरकार आणि एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या किंवा समांतर विचारांच्या घटकांना एकत्र बांधून ठेवणारे सरकार पहिल्यांदा यशस्वीपणे चालवले ते वाजपेयींनी. ते हिंदुत्ववादी आहेत, यात कधीच शंका नव्हती; मात्र त्याचा हिंस्र आविष्कार कधीच त्याच्या वागण्या-बोलण्यात आला नाही. देशाचे वैविध्य समजून समन्वय साधणारे त्यांचे राजकारण भाजपला देशभर पोचवण्यात मोलाचे ठरले. वाजपेयी संसदेत काँग्रेसच्या सरकारचे वाभाडे काढताना सत्ताधारीही ऐकत राहात. अपवादात्मक असा संसदपटू वाजपेयींच्या रूपाने संसदेने पाहिला आहे. तेच वाजपेयी नेहरूंच्या निधनानंतर ‘सूर्यास्त तर झाला; आता ताऱ्यांच्या प्रकाशात वाट शोधूया असे सहजपणे बोलून गेले. पाकिस्तानला नमवणारे युद्ध जिंकणाऱ्या इंदिरा गांधींचे वर्णन दुर्गा असे करताना त्यांना पक्षाभिनिवेश शिवला नाही. नेहरूंनीच ज्यांच्यात भविष्यातला पंतप्रधान पाहिला ते वाजपेयी भाजप सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान बनणे स्वाभाविक होतं. त्यांनी कारगिलमधल्या पाकिस्तानी विश्वासघाताला तोंड दिले; तसेच अणुचाचण्या करून भारतीय उपखंडातील संरक्षण सिद्धतेची समीकरणे कायमची बदलूनही टाकली. महामार्गाचा देशव्यापी सुवर्ण चतुष्कोन साकारणारा महाप्रकल्पही त्यांच्या कारकिर्दीतलाच.

वाजपेयींनीही प्रारंभी पत्रकारिता केली, कविता केल्या आणि लखनौतील मुशायऱ्यांनाही हजेरी लावली. त्यांचे असे बहुपैलू कर्तृत्व आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुढाकाराने जनता पक्षात संघ विलीन झाला आणि पुढे सत्ता आल्यावरही जनता पक्षात झालेल्या फाटाफुटीनंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना संघपरिवाराने केली, तेव्हा अध्यक्षपदावरून बोलताना वाजपेयींनी ‘गांधीवादी समाजवादाचा नारा दिला होता! पण हे नाणे राजकारणात चालले नाही आणि संघपरिवाराने लालकृष्ण अडवानी यांना पुढे करून अयोध्येत ‘बाबरीकांड घडवून आणले, तेव्हा वाजपेयी त्या घडामोडींपासून काहीसे दूरच होते. समन्वयवादी मध्यममार्ग हे वाजपेयीच्या राजधर्माचे सूत्र राहिले. पाकिस्तानशी निर्णायक समझोता करण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले, तरी इतिहासाला दखल घ्यायला लावणारे आहेत. गुजरातच्या दंगलीने विषण्ण झालेल्या वाजपेयींनी जाहीरपणे गुजरात सरकारला राजधर्माची आठवण करून दिली. वाजपेयींचे हेच मोठेपण आहे. एकेकाळी अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर अवघा देश गाजवणाऱ्या वाजपेयींना आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या वाणीनेच दगा द्यावा, यापरते दुर्दैव दुसरे नाही. राजकारणाच्या धबडग्यात राहूनही आपल्या कवी कलंदर वृत्तीसह संपन्न आयुष्य जगलेले वाजपेयी नव्वदीत पदार्पण करताना ‘भारतरत्नने सन्मानित झाले आहेत.


वाजपेयींबरोबरच हा सन्मान स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी आणि शिक्षणतज्ज्ञ पंडित मदनमोहन मालवीय यांनाही मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. पंडितजींच्या कार्याचे मोलही अनमोल आहे. त्यांनी स्थापन केलेल्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे जगजीवन राम यांच्यापासून सेतू माधवराव पगडी यांच्यापर्यंत देशभरातील अनेक अग्रणी स्नातक होते आणि ते विद्यापीठ हेच मालवीयजींचे कायमस्वरूपी स्मारक आहे. त्यांच्या पुरस्काराच्या निमित्ताने मरणोत्तर असा पुरस्कार द्यावा का, हा विषय काहींनी नव्याने चर्चेत आणला आहे. पुरस्काराचे निकष कसे ठरवावेत, यावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते; मात्र मालवीय यांच्या कामगिरीविषयी दुमत असायचे कारण नाही. मालवीय आणि वाजपेयी यांच्या कारकिर्दीत काळाच्या दृष्टीने मोठे अंतर असले, तरी त्यांची वैचारिक बैठक एकाच मुशीतून तयार झालेली होती. मालवीय यांनी आपले समाजकारण आणि राजकारण हे काँग्रेसच्या दुसऱ्याच म्हणजे १८८६ मध्ये झालेल्या अधिवेशनास उपस्थित राहून सुरू केले आणि वाजपेयींची उभी हयात काँग्रेसविरोधातील राजकारण करण्यात गेली असली, तरी दोघांची मानसिक जडणघडण एकाच म्हणजे आर्य समाजाच्या वैचारिक परंपरेतून तयार झाली. मालवीय यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात काँग्रेसमधून बाहेर पडून आपले जीवन शैक्षणिक कार्याला अर्पण केले. वाजपेयींप्रमाणेच त्यांनीही सुरवातीला काही काळ पत्रकारिता केली होती. सायमन कमिशनविरोधातील निदर्शनात ते सहभागी होते. निधनानंतर सहा दशकांनीही स्मरणात राहिलेले त्यांचे काम म्हणजे त्यांनी स्थापन केलेली बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हेच होय. या दोघांच्या सन्मानामुळे ‘काल के कपोल पर लिखता मिटाता हूँ... गीत नया गाता हूँ...’ हे वाजपेयींचे शब्द सहजपणे आठवतात.

लोकमान्य - एक युगपुरुष

आवर्जून पहा आणि अभिमान बाळगा. http://youtu.be/UX9UM5cexg4

सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित सिनेमाचा ट्रेलर...
लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, ‘केसरी आणि मराठा’ सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.

’पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.

केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्‍फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. ’मराठा’सारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून  पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा ’गूळ का साखर’ हा लेख, ‘राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण’ अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.

लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य ‘संघटनात्मक’ कामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.

यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू

कल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू  आपल्या वाट्याला आला तर?

१) "मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?"
Ans:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !"
(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)

२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.. "एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..?"
Ans:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)
ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला ! (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा? कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)

३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू?
Ans:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..)
तो उमेदवार म्हणाला - टी ! (?)
(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )

४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली?
या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.
Ans :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)
उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )

५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात
उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?
Ans:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.? आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..
‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)

६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.?
‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.
उमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.
"असं का.. हीच जागा का. ?"
Ans:- उमेदवाराने उत्तर दिले- "सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.?
त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.
तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.!

नक्की शेयर करा आणि आपल्या मित्रांनाही वाचू दया.
गजानन काळे

''हॅपी जर्नी " (अ फिल्म बाय सचिन कुंडलकर) ''थोड़ी खट्टी… थोडी मिठी… ''

भावाबहिणीच्या नात्यावर मराठीत आजवर असंख्य चित्रपट निघाले असतील. पण ते सर्व चित्रपट हे घराच्या चार भिंतीमध्ये हुंदके देत बंदिस्त होते. सचिन कुंडलकरचा ''हॅपी जर्नी " मात्र याला अपवाद ठरतो. भावाबहिणीच्या हळव्या, मोकळया ढाकळ्या मैत्रीपूर्ण नात्यावर आधारित असलेला सदर चित्रपट आजच्या काळाची गरज ओळखून घराच्या चार भिंतीं भेदत थेट 'चार चाकीच्या' (छोटी मोटारगाडी) आश्रयाला गेला आहे. तो आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ पाहतोय. ''हॅपी जर्नी " चे सादरीकरणातील हे 'वेगळेपण' नक्कीच दखलपात्र असंच आहे नि त्यासाठी सचिन कुंडलकरला धन्यवाद दयायला हवेत.

सदर सिनेमा हा भावाबहिणीच्या नात्यावर असला तरी त्याची भाषा, भावाबहिणीतील हळवं, निखळ मैत्रीपूर्ण नातं आजच्या तरुणाईच्या भावेल असंच आहे. त्यातंच ताईच्या (जानकी) भूमिकेत असलेली गोड,बिनधास्त, थोडीशी बोल्ड प्रिया बापट तर आजच्या तरुणाईची फेवरेटच आहे. त्यातच तिच्या मोठा दादाच्या (निरंजन) भूमिकेत असलेल्या अतुल कुलकर्णीची तिच्याशी जुळलेली केमिस्ट्री यामुळे ''हॅपी जर्नी "अर्थातच प्रेक्षकांना भावतो. पण ''हॅपी जर्नी" पाहून प्रेक्षक पार भारावून वैगेरे अजिबात जात नाहीत. कथानकाची सरळसोट मांडणी, सुरुवातीलाच सिनेमा एकदा घराच्या चार भिंती भेदून बाहेर पडल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा त्याचे घरात घुटमळणे, भावाबहिणीचे नाते फुलू देण्याअगोदरच पुढील व्यक्तिरेखेची (जानकीचा प्रियकर अजिंक्य~ सिध्दार्थ मेनन) कथानकात होणारी (खरं तर अडसर वाटणारी) एन्ट्री, सहकलाकार पल्लवी सुभाषचा अतिशय सुमार दर्जाचा (खरं तर प्राथमिक स्तरावरचा अभिनय), दिग्दर्शकाचा तिची नि निरंजनमधील प्रेमकहाणी फुलवण्याचा तोकडा प्रयत्न, त्या प्रयत्नामुळे जानकी नि निरंजन या भावाबहिणीतील फुलू पाहणाऱ्या नात्याला खोडा बसणं… या सर्व कारणांमुळे ''हॅपी जर्नी" चा प्रवास सुखकर न होता अधेमधे बऱ्याचदा रेंगाळतो, भटकतो नि कंटाळवाणा सुद्धा होतो.

''हॅपी जर्नी " चा ट्रेलर दाखवताना जी गोष्ट दिग्दर्शकाने लपवली होती, तिचा 'पर्दाफाश' मात्र तो चित्रपटाच्या सुरुवातीलाच करून मोकळा होतो! 
कथा सांगताना दिग्दर्शकाने दाखवलेल्या या 'निष्काळजीपणामुळे' आपला चांगलाच भ्रमनिराश होतो नि मग आपल्याला ''हॅपी जर्नी" च्या पुढील प्रवासाविषयी काळजी वाटू लागते. त्यातच परवा मी जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक Mohsen Makhmalbaf यांचा 'GABBEH' हा सुंदर चित्रपट पाहिला असल्याने त्यातील अगदी साधे सरळ असलेलं कथानक उलगडताना दाखवलेल्या चातुर्यामुळे तो चित्रपट शेवटपर्यंत आपलं कुतूहल कायम ठेवत आपली उत्सुकता ताणतो. खरं तर ते 'कुतूहलच' त्या सामान्य कथेला सौंदर्य प्राप्त करून जातं. इथे मात्र दिग्दर्शकाने सुरुवातीलाच रहस्यभेद केला असल्याने ते कुतूहल नाहीसं होतं. बरं यापुढे आपली नि जानकीची सुद्धा अशीच इच्छा असते कि निरंजनने पुढील काही दिवस घरापासून दूर राहत फक्तं निसर्गाच्या सानिध्यात तिच्यासोबत वेळ घालवाण्यासाठी ''हॅपी जर्नी" ला सुरुवात करावी. त्यासाठीच तर त्यांच्या दिमतीला जानकीची आवडती मोटारगाडी होती ना ?
पण इथे सुद्धा सदर चित्रपटलेखक/दिग्दर्शक सचिन कुंडलकर निरंजनला त्याच्या घरीच घुटमळत ठेवतो. मग त्या गाडीचे नक्की प्रयोजन काय ???

फक्तं दिवसा जानकीसोबत गावात चक्कर मारणे नि रात्री शहाण्या बालकाप्रमाणे घरी परतणाऱ्यामुळे, घरी आई वडिलांसोबतच्या प्रसंगामुळे त्या दोघा भावाबहिणीत फुलू पाहणाऱ्या नात्यात वारंवार अडथळा येत राहतो. हे कमी कि काय म्हणून कथेत लगेच जानकीचा प्रियकर अजिंक्यला घुसडण्याची लेखक/ दिग्दर्शक घाई करतो. त्यामुळे त्या दोघा बहिणभावातील नाते फुलण्यास अवधीच मिळत नाही. त्यासाठी अजिंक्यला मध्यंतरानंतर कथेत आणायला हवे होते.

त्यातच मग उत्तरार्धानंतर निरंजन नि त्याच्या मैत्रिणीमधील (पल्लवी सुभाष) प्रेमकहाणीसाठी दिग्दर्शकाने बराच वेळ वाया घालवला आहे. त्यामुळे जानकी नि निरंजनमधील भावाबहिणीचे नाते काही काळ दुर्लक्षित होते. गंमत म्हणजे आपल्या बहिणीच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणारा निरंजन आपल्या प्रेमिकेला पळवून नेण्यासाठी मात्र जानकीच्या आवडत्या मोटरगाडीचा वापर करतो! अर्थात त्यांच्यासोबत जानकीही असतेच. नव्हे तीच त्याला त्यासाठी प्रेरित करते. त्यामुळे उतरार्धानंतर खऱ्या अर्थाने ''हॅपी जर्नी " ला सुरुवात होते असे म्हणणे योग्य ठरेल!

कथानकातील कमकुवतपणा प्रिया बापट नि अतुल कुलकर्णी यांच्या सुंदर अभिनयामुळे थोडाफार झाकला जातो. प्रिया बापटच्या प्रगल्भ अभिनयाची झलक याअगोदरच 'काकस्पर्श' मधे आपल्याला दिसली होती. पण माझ्या मते त्याची मराठी फिल्म इंडस्ट्रीने म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. अतुल कुलकर्णीचा नेहमीप्रमाणेच सयंत, समंजस अभिनय. पल्लवी सुभाषने मात्र मॉडेल्सचा अभिनयाशी तिळमात्र संबंध नसतो (काही अपवाद असतीलही) याची आपल्या सुमार अभिनयाने खात्री पटवून दिली. सुहिता थत्ते नि माधव अभ्यंकर यांनी आपआपली कामे ठिक केली असली तरी मुळातच त्यांना चित्रपटात जास्त वाव नाहीये. मराठी प्रायोगिक रंगभूमी गाजवत असलेला 'सिध्दार्थ मेनन' हा युवा अभिनेता वयाने नि शरीराने खूप लहान वाटतो. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे कौतुक वैगेरे वाटण्याऐवजी कधी कधी तो चेष्टेचा विषय बनतो. ('एकुलती एक' मधे याचा अनुभव आला होता)

''अन्न, वस्त्र,निवारा नि वायफाय मला लागतंच '' हे असे आजच्या तरुणाईला साजेसे ,तजेलेदार संवाद प्रिया बापटच्या तोंडी अगदी शोभून दिसतात. नव्हे ती या अशा संवादाद्वारे आजच्या या तरुणाईचे एक प्रकारे प्रतिनिधित्वच करते! 
बाकी चित्रपटाचे संगीत ठिक असले तरी लक्षात राहणारे वा ठेका धरायला लावणारे अजिबात नाही.

असो. ''हॅपी जर्नी " ची एक गंमत आहे. चित्रपट बऱ्याच वेळेला दिग्दर्शकाच्या हातून सुटतो पण प्रेक्षक मात्र शेवटपर्यंत त्याच्याशी 'कनेक्ट' राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो !
नि याचे क्रेडीट मी अर्थातच प्रिया बापटला देईल. So, प्रिया बापटसाठी ''हॅपी जर्नी " एकदा अनुभवायला हरकत नाही.

~ कल्याण 
(नोव्हेंबर २९, २०१४)

कोका कोला शीतपेयांमध्ये वापरणार फळांचा रस

कोका कोला आणि पेप्सीनं शीतपेयांमध्ये फळांचा रस वापरावा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना 'फळाला' येण्याची चिन्हं आहेत. कारण, फ्रुट ज्युसचा वापर करून सॉफ्ट ड्रिंक बनवण्याचं काम कोक कंपनीनं सुरू केलंय आणि उन्हाळा सुरू होण्याआधी ती बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे फळ उत्पादकांचं भाग्य चांगलंच 'फळ'फळणार आहे.


दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकात इंडिया फुड पार्कचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. तेव्हा, देशातील फळ उत्पादकांना बाजारपेठ मिळावी यादृष्टीनं त्यांनी कोका कोला, पेप्सीसारख्या कंपन्यांना साद घातली होती. आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शीतपेयं विकली जातात. पेप्सी, कोक या कंपन्या देशात अब्जावधी रुपयांची उलाढाल करतात. या कंपन्यांनी आपल्या शीतपेयांमध्ये फक्त पाच टक्के फळांचा रस मिसळल्यास इथल्या शेतकऱ्यांना फळं विकायला अन्य कुठेच जायची गरज भासणार नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधलं होतं. अमेरिका दौऱ्यावेळी पेप्सी, कोकच्या अधिकाऱ्यांपुढे हा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. त्यावर 'कोक'नं सकारात्मक पावलं उचलल्याचं कंपनीतील सूत्रांकडून कळतं.
इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोक फ्रुट ज्युस मिश्रित शीतपेय बाजारात आणणार आहे. साधारणतः एप्रिलमध्ये, उकाडा सुरू होण्याआधी हे पेय लाँच केलं जाईल. त्यावर भारतातच काम सुरू आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन, चाचण्या केल्या जाताहेत. आता हा पूर्णपणे वेगळं, नवंकोरं शीतपेय असेल असेल की मिनिट मेड ज्युससारखं काही असेल, हे अजून निश्चित झालेलं नाही. परंतु, फळ उत्पादकांना त्यापासून मोठा फायदा होईल, हे नक्की.

स्वत:चं काहीतरी सुरू करावंसं वाटतं?

आजपासून 'वैश्विक उद्योजकता सप्ताह' साजरा केला जातो. या निमित्ताने उद्योजकतेचा करिअर म्हणून विचार करणे औचित्यपूर्ण ठरेल. या क्षेत्राकडे वळण्याची सुरुवात होते ती तुमच्या दृढ मानसिकतेपासून!

आज व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.. अभियांत्रिकी, वाणिज्य शाखेची, कला शाखेची पदवी घेतल्यानंतर व्यवस्थापनाचा एखादा खणखणीत अभ्यासक्रम करायचा आणि मग लठ्ठ पगाराची नोकरी करताना एकीकडून दुसरीकडे उडय़ा मारत राहायच्या.. असं करणारे आपल्याला बरेच भेटतात. यातील कितीजण बुद्धिमत्ता असून, संभाव्य बलस्थानं असून स्वत:चा उद्योग उभा करायला मात्र धजावत नाहीत. त्याकरता ते पुरते बिचकतात. यात नवं असं काही नाही.. याची प्रमुख कारणं म्हणजे पैसा, वेळ वाया जाण्याची भीती, उमेद गमावण्याचा संभव आणि सारं काही पटकन मिळवून स्थिरस्थावर होणं अशी बनलेली आपली प्राथमिकता!

या साऱ्या गोष्टी.. आणि जोखीम स्वीकारण्यातला नन्नाचा पाढा आपल्याला नवीन काहीतरी सुरू करण्यापासून रोखतो. त्यासोबतच आपल्याला उद्योजकतेपासून दूर नेत असतं ते आपल्या भोवतालचं वातावरण! मात्र जर कुणाला या साऱ्या परिस्थितीवर मात करत उद्योजक म्हणून हव्या त्या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर मात्र त्या क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या सेवा, उत्पादनांपेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं आणि अधिक द्यायला हवं.

उद्योजक म्हणून एखाद्या क्षेत्रात आपलं बस्तान बसवणं खूप कठीण आहे, हे मान्य. पहिल्या पिढीच्या प्रतिनिधीला तर त्यातील खाचखळगे प्रत्येक टप्प्यावर नव्याने समजत असतात. म्हणूनच एखादं क्षेत्र जेव्हा तुम्ही उद्योगासाठी निश्चित करता, तेव्हा त्या क्षेत्रात तुमचा वावर असणं, त्यातील गरजा, आव्हानं, तत्त्वं माहीत असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर त्या विशिष्ट क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींशी आयडिया शेअर करणं आवश्यक असतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शोध आणि इनोव्हेशन (प्रयोगशीलता) यातील फरक कळायला हवा. इनोव्हेशन म्हणजे तुमची नवनिर्मिती बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं. त्यात लॉजिस्टिक, मार्केटिंगचा विचार केलेला असतो. त्यासाठी यात सांघिक कामगिरी बजावणं आवश्यक असतं. इनोव्हेटिव्ह बिझनेसमध्ये 'व्हॉटस्अॅप'चा समावेश करता येईल. 'व्हॉटस्अॅप'चा जनक असलेल्या जॅन कोयुमचे एक छान वाक्य आहे- 'कठीण परिस्थितीला संधीत बदलता येते.' सरकार फोन टॅप करतं, हे लक्षात आल्याने त्याचे पालक फोन वापरत नाहीत, हे ध्यानात घेत त्याने 'व्हॉटस्अॅप'ची निर्मिती केली.

याबाबत 'इनोव्हेशन' विषयाचे जागतिक स्तरावरील तज्ज्ञ डॉ. शुलामित फिशल म्हणाले, 'योजना, कृती, संशोधन, संवाद, प्रतिसाद (रिफ्लेक्ट), निरीक्षण अशा 'स्पायरल' पद्धतीने प्रयोगशील उद्योजकतेचा विकास होतो.' शुलामित यांनी आणखी एका पद्धतीने उद्योजकतेचा विचार करता येतो, हेही नमूद केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'ज्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, त्यासंबंधीचा डाटा गोळा करणं, त्या माहितीचं विश्लेषण करणं, त्यासंबंधीची कृतीयोजना बनवणं हे उद्योजकतेसाठी आवश्यक ठरतं. एक मात्र नक्की, तुमची कृती योजना अशी असावी, की त्यातून काहीतरी बदल घडणं आवश्यक आहे. प्रयोगशील उद्योजकतेच्या त्रिकोणात प्रेरणा, गरजा आणि इच्छा यांचा समावेश हवा.'

उद्योजकतेकडे वळताना पाच महत्त्वाच्या घटकांचा सविस्तर विचार करावा लागतो. या गोष्टी म्हणजे व्यवस्थापनाचं साहस, प्रयोगशील/सर्जनशील असणं, कम्फर्ट झोन सोडणं, त्याकरता वेळ देणं, समविचारी व्यक्तींचं नेटवर्क तयार करणं.
उद्योजकतेकडे वळण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक असतात, याविषयी सांगताना 'शिक्षणव्यवस्थेतील उद्योजकता' या विषयाच्या इस्रायली अभ्यासक गलित झायमर म्हणाल्या, 'उद्योजकतेकडे वळणाऱ्या व्यक्तीकडे आत्मविश्वास, स्वयंप्रेरणा, सकारात्मकता, धैर्य, निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि बदल घडवण्याची आसक्ती आवश्यक असते. त्यासोबत लागतो तो प्रॅक्टिकल अॅप्रोच! हे सारं शिकता येतं. मात्र ते शिकण्याची, मोठं होण्याची वृत्ती असावी लागते. वास्तववादी असणं, संयम आणि इतरांप्रती आदर असणं, इतरांचं ऐकून घेण्याची वृत्ती असणं अशी गुणकौशल्यंही अंगी बाणवावी लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयशाचा सामना करण्याची तयारी आणि अपयशाला न घाबरणं..'

जगभरात अत्यंत नावाजलेल्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांनी उमेदीच्या काळात ज्या खस्ता काढल्या होत्या- त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे..
  • विजेच्या दिव्याच्या निर्मितीत यश मिळण्याआधी एडिसनला दहा हजार वेळा अपयश आलं होतं.
  • युक्रेनमध्ये जन्मलेला अमेरिकन संगणक वैज्ञानिक मॅक्स लेवचिन याने स्थापन केलेली पहिली कंपनी सपशेल अपयशी ठरली. त्याने स्थापन केलेल्या दुसऱ्या कंपनीला पहिल्याच्या तुलनेत कमी फटका बसला, पण प्रयत्न मात्र साफ फसला. त्याने स्थापन केलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या कंपनीचा परफॉर्मन्स जेमतेम होता. पण त्यातून तो सावरला आणि पे पल या त्याच्या पाचव्या कंपनीने घवघवीत यश संपादन केले.
  • ज्या कंपनीचे अँग्री बर्ड हे कार्टून मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, त्या रोवियो या कंपनीला २०व्या प्रयत्नात यश मिळालं. तोपर्यंत आठ र्वष कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागला.. 'अँग्री बर्ड'ने आठ वर्षांचं सारं अपयश धुवून काढलं.
  • सिल्व्हस्टर स्टेलॉन जेव्हा 'रॉकी' चित्रपट बनविण्यासाठी स्क्रिप्ट घेऊन फिरत होता, तेव्हा त्याला पहिला होकार मिळण्याच्या आधी तब्बल दीड हजार वेळा चित्रपट बनविण्यासाठीचा नकार सहन करावा लागला होता.
उद्योजक होताना लहानशा, नव्याने उचललेल्या पावलापासून सुरुवात करणं आवश्यक ठरतं. चुकांमधून शिकत पुढे सरकणं महत्त्वाचं असतं. उद्योग करताना जेव्हा पदरात अपयश येतं, तेव्हा त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहाणं गरजेचं असतं.
'उद्योजकतेकडे वळणाऱ्यांचं प्रमुख उद्दिष्ट पैसा कमावण्यापलीकडे पोचत नवनिर्मिती हे असेल तर त्या कामातून त्यांना अधिक आनंद मिळू शकतो. यश हे पैशात मोजलं जात नाही तर ते ज्ञानाच्या रूपात आणि अनुभवात मोजलं जातं,' असंही गलित म्हणाल्या.

सुरुवातीला बरीचशी अस्थिरता, काहीशी अनिश्चितता आणि अस्वस्थता पेलण्याची इच्छा व क्षमता असली आणि नेटाने काम केलं तर तुमच्या उद्योजकतेतील नवनिर्मितीला बाळसं धरतं आणि मग त्यापाठोपाठ आपोआपच पैसा, प्रसिद्धी पायघडय़ा घालत येते. मात्र त्यासाठी सुरुवातीची अवघड वळणं, काटेरी प्रवास पेलण्याची धमक हवी.. एक छान वाक्य आहे- 'जर तुम्ही बाहेर पडाल, तर तुम्ही छानशा ठिकाणी पोहोचू शकता..'

एखादी गोष्ट जेव्हा जमत नाही, तेव्हा न जमलेली गोष्ट पुन्हा नव्याने, मेथड बदलून करता येऊ शकते. तुम्ही किती वेळा प्रयत्न करता, तुम्ही प्रयत्न कसे करता, याला बरंच महत्त्व असतं.

तुमची नवनिर्मिती ही जर लोकांना भेडसावणाऱ्या समस्येवरचा उतारा असेल आणि त्या उत्पादनाने केवळ तुमचाच नाही तर इतरांना लाभ होत असेल तर तुम्ही खरे उद्योजक! 
- सुचिता देशपांडे

थ्री डी प्रिंटींग : अर्थात सेल्फी स्टॅच्यू

कॅमेरा फोन्स आणि सोशल नेटवर्किंग या दोन बाबींमुळे अल्पावधीतच सेल्फी फोटोंना अमाप लोकप्रियता मिळाली. २०१३ मध्ये सेल्फी हा सोशल नेटवर्किंग साइट्सवर सर्वाधिक वापरण्यात आलेला शब्द होता. ऑक्सफर्ड डिक्शनरीनेही सेल्फी शब्दाची दखल घेऊन त्याला 'वर्ड ऑफ दि इयर' ठरवले. आता सेल्फीची पुढची पायरी म्हणून सेल्फी स्टॅच्यूकडे पाहिले जात आहे. नव्या थ्री-डी प्रिंटींग तंत्रज्ञानाच्या आधारे आपले शरीर स्कॅन करून स्वतःचा पुतळा तयार करण्याचा ट्रेंड रुजू पाहतो आहे.

अमेरिकेत एकट्या न्यूयॉर्कमध्ये गेल्या वर्षभरामध्ये स्टॅच्यू तयार करून देणारे चार स्टुडिओ आहेत. पूर्वी आपला पुतळा तयार करून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला शिल्पकारासोबत काही दिवस बसावे लागत होते. थ्री-डी स्कॅनिंग व प्रिंटींग तंत्रज्ञान अद्ययावत झाल्याने अवघ्या काही सेकंदांमध्ये तुमचे शरीर स्कॅन करून प्रिंटरमध्ये त्याची प्रतिमा साठवली जाते व त्यानुसार अपेक्षित आकारमानामध्ये पुतळा तयार करण्यात येतो. न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ आर्ट अँड डिझाइनने आतापर्यंत अशाप्रकारचे ६,००० स्टॅच्यू तयार केले आहेत. या स्टॅच्यूंची किंमत साधारणतः ३० डॉलर्सपासून आहे. साडेतीन इंच इतक्या लहान आकारापासून हे पुतळे तयार करण्यात येतात. प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक वूडी अॅलन यांनीही थ्री-डी स्कॅनिंगच्या माध्यमातून आपला पुतळा तयार करून घेतला आहे. स्मिथसॉनियन इन्स्टिट्युशनने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना स्कॅन करून त्यांचाही थ्री-डी प्रिंटेड स्टॅच्यू बनवला आहे.

हे स्टॅच्यू पूर्णतः रंगीत असतात. यासाठी जिप्सियम पावडरचा वापर करण्यात येतो. या तंत्रज्ञानामध्ये विविध प्रकारच्या सामग्रीचा वापर करता येऊ शकतो. या सेल्फी स्टॅच्यूची लोकप्रियता पाहून वॉल मार्टसारख्या मोठ्या कंपनीने आपल्या शॉपिंग मॉलमध्ये अशाप्रकारचे स्टुडिओ सुरू करण्याची योजना आखली आहे. वॉल-मार्टच्या ब्रिटनमधील 'एएसडीए' या स्टोअरमध्ये नोव्हेंबरपासून थ्री-डी स्टॅच्यू बनवून देण्यात येतील. या तंत्रज्ञानामुळे एखाद्या कार्टून कॅरेक्टरच्या शरीरास आपला चेहरा अशा स्टॅच्यू बनवण्याच्या विविध शक्यता अस्तित्वात येऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये या स्टॅच्यूंना मिळणारी लोकप्रियता वाढत आहे. आपल्याकडे स्टॅचू बनवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही पालकांची असते व त्यांना आपल्या लहान मुलांचे स्टॅच्यू बनवून घ्यायचे असतात, असे 'आय मेकर स्टोअर' या स्टुडिओचा निर्माते स्लिवेन प्रेयमाँट सांगतात. अमेरिका व ब्रिटनमध्ये या स्टॅच्यूंना मिळत असलेली लोकप्रियता पाहता भविष्यामध्ये अन्य देशांमध्येही असे स्टुडिओ मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र Android वर

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.

साने गुरुजी लिखित छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र Android वर मिळविण्यासाठी क्लिक करा.

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१४ प्रकाशित झाला आहे

Aarth Marathi E-Diwali Edition Cover
गेल्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा देखील अर्थ मराठी दिवाळी अंक विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. PDF तसेच Android App स्वरूपांत आपण तो खाली दिलेल्या लिंक वरून प्राप्त करू शकता.अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१4 मध्ये
लेख / कविता / छायाचित्र / विनोद सादर करणारे मान्यवर :
मंगेश सपकाळ, गौरी ठमके, विजय भोळे, कल्याण शितोळे, विशाल कदम, अश्विनी कुलकर्णी, ताहीर मणेर, अविनाश कुलकर्णी, विनायक रसाळ, डॉ.भगवान नागपूरकर, संतोष बोंगले, डॉ.प्रकाश सावंत, सदाफ कडवेकर, वर्षा जाधव, नितीन यादव, महेंद्र भुरे, अक्षय असलेकर, Ashle Mateo, अनय जोगळेकर, निलेश पर्हाटे, गणेश पावले, सुधीर देओरे, अक्षर प्रभू देसाई, जयश्री बोऱ्हाडे, गणेश बगल, Laura Jenhison, सुरेश पुरोहित, भगवान निळे, दर्शन शाह, प्रशांत वांजरे, संजय उपासनी, भरत उपासनी, घनश्याम देशमुख
फेसबुकवरील अधिकृत पृष्ठ
® अर्थ मराठी
ई-पुस्तक प्रकाशक :
® अर्थ मराठी
अँड्रॉइड प्रकाशक :
® Ashlesha Apps
वेब आवृत्ती :
® स्क्राइब.कॉम
आय एस बी एन:
9781311497529
© सर्व हक्क राखीव

'मंगल'कार्य सिद्धिस

भारताच्या अवकाश कार्यक्रमाची "मंगल‘ प्रभात बुधवारी झाली. पहिल्याच प्रयत्नात "मंगळयान‘ मंगळाच्या कक्षेत पोचवून भारतीय शास्त्रज्ञांनी नवा इतिहास लिहिला. अमेरिका, रशिया, जपान, चीन या महासत्तांना जी गोष्ट पहिल्याच प्रयत्नात साध्य झाली नाही, ती गोष्ट भारतीय शास्त्रज्ञांनी साध्य केली अन्‌ प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा आशियातील पहिलाच देश ठरला आहे. या यशामुळे अवकाश क्षेत्रातील नवी ताकद म्हणून भारत पुढे आला आहे. 

भारताच्या मंगळ मोहिमेची सुरवात गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी झाली होती. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत मंगळयान (मार्स ऑर्बिटर मिशन) पृथ्वीभोवती 250 किलोमीटर बाय 23 हजार 550 किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आले. मंगळाला गवसणी घालण्याचा हा पहिला टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) लीलया पार केला. सुमारे 300 दिवसांच्या प्रवासानंतर व सुमारे सहा कोटी किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर बुधवारी सकाळी वेग कमी करून योग्य कक्षेत नेण्यासाठी मंगळ यानाचे इंजिन 7 वाजून 17 मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आले.

मंगळयानापासून पृथ्वीपर्यंत संदेश पोचण्यासाठी सुमारे 12 मिनिटांचा कालावधी लागत आहे, त्यामुळे प्रत्यक्ष इंजिन सुरू झाल्याचा संदेश 7 वाजून 29 मिनिटांनी मिळाला. हा संदेश मिळताच येथील नियंत्रण कक्षात असलेल्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. यानाचे काम पूर्णपणे व व्यवस्थित सुरू असल्याचे ते निदर्शक होते. पुढील 24 मिनिटेही निर्णायक होती. याच काळात यानाचा वेग प्रतिसेकंद 22.3 किलोमीटरवरून 4.2 किलोमीटर प्रतिसेकंदापर्यंत आणण्यात येणार होता. सुमारे आठ वाजता यानाकडून संदेश आला आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थापित करण्यात आल्याचे "इस्रो‘ अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी जाहीर केले. हे इंजिन सुरू होण्यात अडचण निर्माण झाली असती, तर पर्यायी योजना तातडीने कार्यान्वित करावी लागली असती. त्यानुसार आठ थ्रस्टर्सच्या मदतीने यानाला मंगळाच्या कक्षेत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे लागले असते. मात्र नेमून दिलेल्या आज्ञांप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया झाल्याने शास्त्रज्ञांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

"इस्रो‘तील संशोधकांची ही कामगिरी पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नियंत्रण कक्षात उपस्थित होते. अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) सोडलेले "माविन‘ यानही दोन दिवसांपूर्वीच मंगळाच्या कक्षेत स्थिर झाले आहे. मंगळयान व "माविन‘ या दोघांची उद्दिष्टे साधारण सारखीच आहेत. भारताच्या या कामगिरीबद्दल "नासा‘नेही अभिनंदन केले आहे. 

भारताच्या या मंगळ मोहिमेला इतर देशांच्या मोहिमांच्या तुलनेत खूपच कमी खर्च आला आहे. केवळ 15 महिन्यांच्या तयारीनंतर अंतराळात सोडलेल्या मंगळयानाचा खर्च सुमारे 450 कोटी रुपये आहे. जगभरातील विविध देशांनी मंगळावर 51 मोहिमा आखल्या. त्यापैकी केवळ 21 यशस्वी झाल्या. या यशस्वी देशांच्या पंक्तीत भारत आता जाऊन बसला आहे. 

काय करणार मंगळयान? 
पुढील सहा महिने मंगळयान तेथील वातावरणाचा अभ्यास करणार आहे. तसेच तेथील वातावरणात मिथेन वायू आहे का, याचाची शोध घेणार आहे. त्याचबरोबर तेथे कधी काळी पाणी होते का, याचाही शोध घेतला जाणार आहे. 

‘क्‍युरिऑसिटी‘कडूनही अभिनंदन 
"नासा‘ची "क्‍युरिऑसिटी‘ ही बग्गी (रोव्हर) सहा ऑगस्ट 2012 रोजी मंगळावर उतरली होती. या बग्गीनेही मंगळयानाशी संपर्क साधून अभिनंदन केले आहे. "नमस्ते, मार्स ऑर्बिटर! पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान स्थापित केल्याबद्दल "इस्रो‘चे अभिनंदन,‘ असा संदेश "क्‍युरिऑसिटी‘ने पाठविला आहे. यावर "मार्स क्‍युरिऑसिटी संपर्कात राहा. मी जवळच असेन!‘ असा अभिनंदनाचा स्वीकार करणारा संदेश "मंगळयाना‘च्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आला. 

अभिमानास्पद क्षण : मनमोहनसिंग 
"देशाच्या दृष्टीने हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. मंगळ मोहिमेशी संबंधित प्रत्येकाचे हार्दिक अभिनंदन. "मंगळयान‘ प्रकल्पाची सुरवात केलेल्या सरकारचा एक भाग असल्याची भावना अभिमानास्पद आहे,‘‘ अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली आहे. 

भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या कामगिरीमुळे पूर्वजांचा सन्मान केला आहे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मानवाच्या कल्पनाशक्तीपलीकडची कामगिरी आपण केली आहे. आजच्या यशामुळे आपल्यामध्ये अधिक जोश, उत्साह निर्माण होवो. आता आणखी उत्तुंग ध्येय आपण आपल्यासाठी निश्‍चित करूया. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

आजचे सुभाषित

एके काळी जमीन, सोने, गाय , धान्य ह्याला संपत्ती समजले जायचे. आज काल ज्ञान हीच संपत्ती बनले आहे.

अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति ।
व्ययतो बुद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात् ॥

आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगून ठेवले होते कि ज्ञान हा एक असा अद्भुत कोश आहे, कि ज्यातून आपण जिती खर्च करू तितकाच तो वाढत जातो.

ज्ञान निर्माण करायचे असेल तरी सर्वांना मुक्त हस्ताने ज्ञान उधळण्याची सोय असली पाहिजे व ज्ञानाचे हे कोश ज्याला लुटायचे असतील त्याले लुटायची मुभा असली पहिजे.

अमेरिके सारख्या देशांत उच्च शिक्षण हे पूर्णतः सरकारी नियमा पासून मुक्त आहे. कुणीही आपले विद्यापीठ उघडू शकतो व आपल्या पदवी प्रदान करू शकतो. आर्थिक नफ्या साठी विद्यापीठ चालविणे अमेरिकेत पूर्णतः कायदे समंत आहे. त्याच वेळी प्राथमिक आणि माध्यमिक क्षेत्रात अमेरिकन सरकारची लुडबुड फारच आहे. परिणाम स्वरूप अमेरिकन उच्च शिक्षण आज सहज पणे फार चांगल्या दर्जाचे आहे, व त्याच वेळी प्राथमिक आणि माधामिक क्षेत्रांत अमेरिकन शाळा जगाच्या फार मागे आहेत. भारतीय शिक्षण पूर्णपणे सरकारी नियंत्रणात असल्याने भारतीय शिक्षण सर्वच क्षेत्रांत दुय्यम दर्जाचे बनले आहे.

ज्ञानाचा कोश भरतोय सरकारने पिंजर्यात बंद करून ठेवल्याने सर्वांचेच नुकसान होत आहे.

भारतीय अर्थतज्ञ श्री अरविंद पनगरिया खालील मुलाखती भारतीय शिक्षण व्यवस्थे विषयी बोलत आहेत. आपले सरकार त्यांचे ऐकिल एवढी तरी अपेक्षा आपण ठेवू शकतो.

प्रतिभेचे देणे

पु ल देशपांडे ह्यानी आपल्या एका प्रवासवर्णनात एका जपानी शहराचे वर्णन केले होते. त्यात पु ल नि म्हटले होते की "अश्याच एका निवांत संध्याकाळी, असेच दिवे बघताना रवींद्रनाथनी 'शुभं करोति कल्याणम्' लिहून टाकले पण आपल्यासारखे साधारण लोक मात्र आपल्याला तसल्या प्रतिभेचे देणे लाभले नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय आणखी काही करू शकत नाहीत."
पु ल सारख्या लेखकांची हालत अशी होत असेल तर आमच्या सारख्या फुटकळ लेखक मंडळीना काय वाटावे ?
प्रतिभेचे देणे म्हणजे काय असते हे समजायला जास्त त्रास घ्यायची गरज नाही. तो एक कवी, आपल्या छोट्याश्या खोलीत गगनाला गवसणी घालतोच पण त्या काही शब्दांत आमच्या सारख्याना आपण किती छोटे आहोत ह्याची जाणीव करून देतो. आम्ही सर्वानीच कधीतरी प्रेमकाव्य लिहिले आहे, पण पु ल सावरकरांच्या प्रेमकाव्या विषयी काय लिहितात ते पहा.
सावरकरांनी प्रेमकाव्य लिहिलं. पण त्या प्रेमाची उत्तुंगता काय!
शतजन्म शोधीताना शत आर्ति व्यर्थ झाल्याशतसूर्य मालिकांच्या दीपावली विझल्या.
केवढं विराट स्वरूप...कि तुझी माझी आत्ता या क्षणी गाठ पडतेय, त्याच्यापूर्वी काय झाल?
शतजन्म शोधत होतो, शत आर्ति व्यर्थ झाल्या आणि शतसूर्य मालिकांच्या
दीपावली विझल्या होत्या. येवढा काळ गेला होता... येवढं विराट जे कुणी पाहू
शकतो, त्याची प्रतिभा कुठल्या जातीची असेल...
गजल लिहिणारे कवी असंख्य आहेत पण खालील शब्दात आपली व्यथा व्यक्त करणार्या गजल लेखकाला देवी सरस्वतीचा तो आशीर्वाद लाभला आहे ह्यात शंकाच नाही.
मुझसे मिलने के वो करता था बहाने कितने,
अब गुजारेगा मेरे साथ ज़माने कितने,
मैं गिरा था तो बहुत लोग रुके थे लेकिन,
सोचता हूँ मुझे आए थे उठाने कितने,
जिस तरह मैंने तुझे अपना बना रखा है,
सोचते होंगे यही बात न जाने कितने,
तुम नया ज़ख्म लगाओ तुम्हे इससे क्या है,
भरने वाले है अभी ज़ख्म पुराने कितने, 
 http://goo.gl/m2tr2d

अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१४ साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन


रितेश देशमुखचं मराठी चित्रपटात 'लई भारी' पदार्पण...!!

माझा पहिला हिंदी चित्रपट पाहण्यासाठी वडील विलासराव देशमुख उपस्थित होते. मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले याचा त्यांना खूप आनंद झाला होता. आता माझा पहिलाच मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि तो चित्रपट पाहण्यासाठी माझे वडील नसले तरी त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत, असे भावपूर्ण उद्‌गार अभिनेता रितेश देशमुख याने काढले. 

"लय भारी‘ या मराठी चित्रपटाद्वारे रितेश मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाची निर्मिती जितेंद्र ठाकरे, शालिनी ठाकरे आणि अमेय खोपकर यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. या चित्रपटाचा "फर्स्ट लूक‘ आणि "म्युझिक लॉंच‘ सोहळा गोरेगाव येथे झाला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच राजकारणातील मान्यवर उपस्थित होते. रितेश म्हणाला, की माझा पहिलाच हिंदी चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा मला जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा अधिक आनंद आता झाला आहे. कारण माझा पहिलाच मराठी चित्रपट येत आहे. मराठीसाठी मी स्वतःला "न्यूकमर‘ समजतो. या चित्रपटात काम करीत असताना चित्रपटाच्या टीमने मला सांभाळून घेतले, तसेच आता मायबाप प्रेक्षकांनीही सांभाळून घ्यावे. हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपटात काम करण्याचा अनुभव निश्‍चितच सुखद होता. निशिकांत कामतबरोबर काम करण्याची इच्छा माझ्या मनात होती. आता या चित्रपटाद्वारे ती पूर्ण झाली आहे. 

संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटातील संगीताबद्दल माहिती दिली. "नटरंग‘ चित्रपटातील संगीत लोकप्रिय ठरले होते. या चित्रपटातील संगीतही तेवढेच, किंबहुना त्यापेक्षाही लोकप्रिय ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मध्यंतरी आम्ही हिंदी चित्रपटांत गुंतलो होतो. त्यानंतर अन्य काही कामांत व्यस्त होतो. आता पुन्हा मराठीकडे वळलो आहोत, असे ते म्हणाले. निर्माते जितेंद्र ठाकरे म्हणाले, की साजिद नाडियादवाला यांनी ही कथा आम्हाला ऐकविली. त्यानंतर आम्ही याच कथेवर चित्रपट काढायचा असे ठरवले.

मराठी तरूणाची अमेरिकेत भरारी

ग्रामीण भागातील युवकांसाठी शिक्षणासाठी मोठ्या शहरात येणे हे देखील मोठे आव्हान असते. त्यावेळी धुळे जिल्ह्यातील निजामपूरसारख्या लहान गावातून आलेल्या अक्षय बाविस्करने उच्च शिक्षणासाठी नुसते वॉशिंग्टन गाठले नाही तर गाजवलेही. वॉशिंग्टनमधील हॅकेथॉन ही स्पर्धा तर त्याने जिंकलीच पण सोबतच एक अभिनव संकल्पना असलेली अॅडव्हर्टायझिंग कंपनी तिथेच स्थापन करून संपूर्ण मराठी तरूणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

जगात स्वतःच्या उत्पादनाची जाहिरात करण्याची कंपन्या नेहमीच नवनव्या आयडिया लढवत असतात. दुसरीकडे मोबाइलच्या माध्यमातून हातात आलेल्या कॅमेरामुळे कुठल्याही ठिकाणी, अगदी लहानसहान गोष्टींचे फोटो काढून सोशल साइट्वर शेअर करण्यात बहुतांश जण आनंद मानतात. या दोन गोष्टी एकत्र केल्या तर? हाच विचार अक्षय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला आणि स्थापना झाली Blurpi. फोटो काढतानाच त्यावर कंपनीचा लोगो आला आणि सोशल मीडियाद्वारे तो शेअर करताना तुमचा ब्रँडही सर्वांपर्यंत पोहोचणार अशी ही संकल्पना. गेल्यावर्षी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या प्रतिष्ठित अशा अँजेलहॅक या हॅकेथॉनमध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली. भारतासह जगातील काही मोजक्या शहरांमध्ये ही स्पर्धा होते. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या या स्पर्धेत अक्षयची टीम जिंकली आणि जगभरातील १३ देशांमधून विजयी ठरलेल्या २२ टीमसह सॅन फ्रान्सिको येथील AngelHack Accelerator प्रोग्रॅममध्ये त्यांचा समावेश झाला. यामध्ये या टीमला त्यांची आयडिया बिझनेस स्वरुपात येण्यासाठी ट्रेनिंग दिले जाते. यामाध्यमातून त्यांना गुंतवणूकदारांनाही आकर्षित करता येते. या टप्प्यातून गेलेल्या या टीमने त्यांची स्वतंत्र वेबसाइट आणि मोफत उपलब्ध असलेले आयओएस अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून फोटो काढता येतो, त्यावर तुमच्या ब्रँडचा लोगो आपोआप येतो आणि हे सोशल नेटवर्किंग साइटवर शेअरही करता येते. प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा मोफत उपलब्ध असून तज्ञांची मदत हवी असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात.

टीममधील सदस्य कोण?
अक्षय बाविस्कर, वॉशिंग्टन विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर केलेला टोडोर इलिव्ह, वॉशिंग्टनच्याच एका कॉलेजातून पॉलिटीकल सायन्समध्ये बीए केलेली आणि कंपनीत मार्केटिंगची जबाबदारी सांभाळणारी गाल्या मेटानोव्हा, व्हर्जिनियातील विद्यापीठातून कम्प्युटर इंजिनीरिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्स केलेला आणि मोबाइल डेव्हलपमेंटची जबाबदारी सांभाळणारा नितीन अलबुर.

अक्षयचा प्रवास
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपुर या गावात अक्षयने ९ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १० वी साठी धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ११ आणि १२ सायन्स धुळ्यातील जयहिंद ज्युनियर कॉलेजमधून पूर्ण केल्यावर त्याने पुण्यातील VIIT मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्यानंतर कम्प्युटर इंजिनीअरिंगमधील एम. एस. पूर्ण करण्यासाठी त्याने न्यूयॉर्कमधील Syracuse विद्यापीठात प्रवेश घेतला.

अच्छे दिन आने वाले है...

हा विजय आहे नरेंद्र मोदी या नावाचा... एका माणसाने बदलून टाकली जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सत्ता... खरंच, अच्छे दिन आने वाले है...गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर स्टेशनमद्धे रेल्वे गाड्यांमध्ये अन फलाटावर चहा विकणारा एक मुलगा राजेश खन्नाचा प्रचंड चाहता होता. तरुण वयात तो त्याच्यासारखेच कपडे घालून त्याच्यासारखी डायलॉगबाजी करायला शिकला. जी त्याच्या पुढील कारकिर्दीमद्धे त्याला खूप पुढे घेऊन गेली. चारचौघात तो धीटपणे बोलायला शिकला. बघता बघता तो सार्वजनिक ठिकाणी भाषण द्यायलाही शिकला, आणि मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही. देशाने शेकडो मुख्यमंत्री पाहिले पण विकासाचा धूमधडाका उडवणारा आणि तरीही भ्रष्टाचारापासून चार हात दूर असलेला असा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे नरेंद्र मोदीच असा नावलौकीक मिळवणारा हा नेता म्हणूनच आज देशातील करोडो तरुणांसाठी आशेचा एक मोठा किरण ठरलाय. 

पहिल्या इनिंगमद्धे जबरदस्त खेळी करणारे मनमोहन सिंग दुसऱ्या इनिंगमद्धे मात्र सपशेल फेल गेले, आणि देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला. देशावर आज तब्बल ४२६ बिलिअन डॉलर म्हणजे साडे पंचवीस लाख कोटींचे परदेशी कर्ज आहे. जे तुम्हा आम्हालाच फेडायचे आहे. गेल्या तीन-चार वर्षात विकास दर ९ टक्केवरून पाच टक्केच्याही खाली घसरलाय त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था गाळात रुतलीय. परदेशी गुंतवणूकदार देशात पैसे गुंतवायला तयार नाहीत. त्यामुळे आज लाखो तरुण रोजगाराअभावी घरी बसले आहेत.

परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी वित्त संस्था नरेंद्र मोदींच्या आगमनाकडे डोळे लावून बसले होते. गेल्या काही दिवसात शेअर बाजारामाद्धे त्यामुळे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक व्हायला सुरुवात झालीय. आता मोदी पंतप्रधान झाले तर सेन्सेक्स तीस हजाराचाही पल्ला गाठून बाजारात छप्परतोड तेजी यायची संभावना झालीय. त्यामुळे देशात प्रचंड परदेशी गुंतवणूक होईल, आणि लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विकास दर पुन्हा एकदा उसळी घेऊन सहा टक्केच्या वर जाईल. आणि तुमच्या आमच्या पगारात चांगली वाढ होऊन वर्षाला घसघशित बोनसही मिळेल. 

मोदी पंतप्रधान झाले तर रुपया जी मुसंडी मारेल ती केवळ अविश्वसनीय अशीच असेल. जसा तो चाळीस वरून सत्तर रुपयापर्यंत कोसळला तसाच तो पुन्हा एकदा ४०-४५ च्या दिशेने जोरदार मुसंडी मारायचा प्रयत्न करेल. त्यामुळे देशाला कोणता फायदा होईल ? पेट्रोल आणि डीझेलसाठी आपण दर वर्षी लाखो कोटी रुपयांचे परदेशी चलन देतो त्यात दोन पाच लाख कोटींची बचत होईल. त्यामुळे पेट्रोल डीझेलचे भाव कमी होतील. साहजिकच महागाईवर नियंत्रण आणणे सरकारला सहज शक्य होईल. राहिली गोष्ट भ्रष्टाचाराची. त्या बाबतीत तरी नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यामद्धे जमीन आसमानाचा फरक आहे. लाखो कोटींचे घोटाळे झाले तरी मुग गिळून बसणाऱ्या मनमोहन सिंगपेक्षा नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्वाच इतके प्रभावशाली आहे कि भ्रष्टाचार करणारा कुठलाही मंत्री दहा वेळा विचार करील. 


डॉ.प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरोअक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Second Teaser of DR.PRAKASH BABA AMTE-The Real Hero

Watch & Share the 2nd Teaser on official Youtube link ► http://bit.ly/dpba2ndteaser

Give one word for this अफलातून Teaser !

पहिल्यांदाच मराठी पुस्तकाचा व्हिडियो ट्रेलर


पुन्हा नव्याने सुरुवात या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीतील साय-फाय लेखक अभिषेक ठमके आपणासमोर साय-फाय मराठी पुस्तकांची मालिका घेऊन येत आहे. त्यांच्या नव्या पुस्तकाचा ट्रेलर नक्कीच पहा आणि आपले अभिप्राय कळवा. मराठी साहित्यामध्ये एखाद्या पुस्तकाचा प्रकाशनापूर्वी ट्रेलर दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सदर कादंबरी १ मे २०१४ रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रकाशित होत असून ही कादंबरी आपल्याला ९ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वाचावयास मिळणार आहे.
व्हिडियो आवडल्यास शेयर करण्यास विसरू नका.

लेखक : अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
सहाय्यक-लेखक : गौरी अभिषेक ठमके
प्रस्तावना : गौरव गायकवाड
शीर्षक : कल्याण शितोळे
मुखपृष्ठ : अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला Valentine Day करा खास...


आपल्या प्रिय व्यक्तीसोबत हा Valentine Day करा खास. Valentine Day च्या निमित्ताने आज पासून 'ओलांडून जाताना...' एक उत्कंठावर्धक प्रेमकथा आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत, सोबतच 'मैत्र जीवांचे' कादंबरीमध्ये सुधारणा करून कादंबरी आपल्यासाठी नव्या स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.

'ओलांडून जाताना' पुस्तकाचे लेखक आहेत ओमकार मंगेश दत्त...लेखकाने २०१० मध्ये सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'इरादा पक्का' सिनेमाचे स्क्रीनप्ले लिहिले आहेत. तसेच मराठी मालिका 'वरचा क्लास' चे देखील स्क्रीनप्ले लिहिले आहे. त्यांनी हिंदी सिनेमा 'तो बात पक्की' आणि मराठीतील ऑल टाइम सुपरहिट 'अगं बाई अरेच्चा' सिनेमामध्ये असिस्ट-डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी 'बकुळा नामदेव घोटाळे' आणि 'माझा नवरा तुझी बायको' सिनेमा मध्ये देखील काम केले आहे.
तर अशा प्रगल्भ लेखकाकडून या Valentine Day ला आपल्यासाठी ही एक सुंदर भेट.

दोन्ही पुस्तके अर्थ मराठी तर्फे वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

'ओलांडून जाताना' ई-पुस्तकाचे Application डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://play.google.com/store/apps/details?id=com.acrutiapps.marathi.olandun

'ओलांडून जाताना' ई-पुस्तकाचे Application ब्लॉगवरून डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
http://abhishek.acrutiapps.com/2014/02/13/olandun-jatana-by-omkar-mangesh-datt/

'ओलांडून जाताना' ई-पुस्तक Online वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
http://www.scribd.com/doc/205336503/Olandun-Jatana

'मैत्र जीवांचे' ई-पुस्तकाचे नवे Application डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
http://abhishek.acrutiapps.com/2014/02/10/maitr-jiivaance-marathi-love-story/

'मैत्र जीवांचे' ई-पुस्तकाचे Application ब्लॉगवरून डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://play.google.com/store/apps/details?id=in.co.akshar.maitrajeevanche

ओलांडून जाताना... एक उत्कंठावर्धक प्रेम कथा


लेखक
ॐकार मंगेश दत्त

मुखपृष्ठ
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके

संकलन - पृष्ठ रचना
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके

ई-प्रकाशक
अर्थ मराठी

अँड्रॉइड अॅप प्रकाशक
अक्षर प्रभू देसाई

आय.एस.बी.एन. 
अमेझॉन - क्रिएटस्पेस
978-1495436741

आपल्या प्रिय व्यक्तीसोबत हा Valentine Day करा खास. या वर्षी Valentine Day चा मुहूर्त साधून 'फेन्ड्री' हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे. तर मराठी साहित्य तरी कुठे मागे राहणार...??

या Valentine Day ला आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत 'ओलांडून जाताना...' एक उत्कंठावर्धक प्रेमकथा.
सदर पुस्तकाचे लेखक आहेत ओमकार मंगेश दत्त...लेखकाने २०१० मध्ये सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'इरादा पक्का' सिनेमाचे स्क्रीनप्ले लिहिले आहेत. तसेच मराठी मालिका 'वरचा क्लास' चे देखील स्क्रीनप्ले लिहिले आहे. त्यांनी हिंदी सिनेमा 'तो बात पक्की' आणि मराठीतील ऑल टाइम सुपरहिट 'अगं बाई अरेच्चा' सिनेमामध्ये असिस्ट-डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी 'बकुळा नामदेव घोटाळे' आणि 'माझा नवरा तुझी बायको' सिनेमा मध्ये देखील काम केले आहे.
तर अशा प्रगल्भ लेखकाकडून या Valentine Day ला आपल्यासाठी ही एक सुंदर भेट.
१४ फेब्रुवारी रोजी हे पुस्तक ई-पुस्तक आणि Android Application स्वरुपात प्रदर्शित होत आहे. आपणांस सदर ई-पुस्तकाची प्रत हवी असल्यास आपला ई-मेल आय.डी. कमेंट मध्ये द्यावा आपणांस ई-मेल द्वारे आपणांस ई-पुस्तकाची प्रत पाठविण्यात येईल.
लवकरच Aarth Marathi वर online ई-पुस्तक आणि गुगल प्ले Application ची लिंक अपडेट केली जाईल.

'टाईमपास'

पौगंडावस्थेतील निरागस प्रेम अनुभवायचं असेल तर एकदा 'टाईमपास' बघाच !!

आजवर आपल्याला Matured प्रेम कहाण्या बघायची सवय आहे. म्हणजे हिंदी असो वा मराठी महागडी तिकीटे काढून थिएटर मध्ये जावं तर प्रत्यक्षात तिशी (कधी कधी चाळीशी सुद्धा) पार केलेल्या पण पडद्यावर गेल्या बऱ्याच वर्षांपासून १६ टे २५ वयोगटाच्या युवक-युवतींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या प्रेमकहाण्या पाहाव्या लागायच्या...पण 'teen ages' चं काय..??

पौगंडावस्थेत ज्यावेळी प्रेमाची अंकुरे फुलू लागतात तेव्हा पांढरपेशा समाज आणि आता तर चार बुकं शिकून शहाणा झालेला सगळाच समाज त्याला 'लैंगिक आकर्षण' असं गोंडस नाव देऊन मोकळा होतो. पण ते तसं प्रत्येक वेळीच नसतं असा विश्वास 'टाईमपास' हा बहुचर्चित सिनेमा देऊन जातो.

न विसरता येणारं पाहिलं प्रेम..तो उमलण्याचा काळच असा असतो कि त्याला जात-पात, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ट हि कसलीच कुंपणं माहित नसतात..त्याला फक्त वाहणं माहित असतं..त्या अदृश्य कुंपणांच्या जाळ्यांतून... आजवर केवळ ऐकलेलं नुकताच वयात आलेला नवतरुण जेव्हा स्वत: 'feel ' करू लागतो..तेव्हा सारं जग त्याला वेगळं भासू लागतं..छान छान वाटू लागतं...पण या छान छान जगात जेव्हा वास्तवाचा निखारा खदखदू लागतो..तेव्हा येणारं शहाणपण माणसाला 'पोक्तपणा' कडे झुकवते..किंवा मग आयुष्याला वेगळीच कलाटणी देते..कधी कधी कायमसाठी..'टाईमपास' हा चित्रपट याच सर्व प्रवासातून जातो...

इथे कुणीही मोठा (म्हणजे तसं वय झालेला) हिरो वा हिरोईन नाही. पडद्यावरचा झोपडपट्टीत राहणारा दगडू आणि इमारतीत राहणारी प्राजक्ता यांमध्ये थिएटर मध्ये बसलेला 'teen' स्वतःला शोधू लागतो. Nostalgic होतो..चित्रपटात वेळोवेळी येणाऱ्या punches ना मनमुराद दाद देतो..खुर्चीवर लोळून लोळून हसतो..आणि हेच चित्रपटाचे यश आहे.. 'शेवट थोडा अजून वेगळा असता तर बरं झालं असतं' असं एकदा वाटून जातं पण चित्रपटाचा आता 'part २' सुद्धा येणार हि भावना तो विचार मनातून काढून टाकते उत्सुकता वाढवते..

बाकी "आईबाबा आणि साईबाबाची शपथ..पुन्हा एकदा पहिल्या प्रेमाची आठवण आणि पौगंडावस्थेतील निरागस प्रेम अनुभवायचं असेल तर एकदा 'टाईमपास' बघाच.

लेख- गौरव गायकवाड.